
थोडक्यात बातमी:
रमी व्हिडिओवरून राजकीय वादंग: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौफेर टीका सुरू झाली असून, त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे.
पदभार बदलण्याची शक्यता: अजित पवार कोकाटे यांना कृषिमंत्री पदावरून हटवून मकरंद पाटील यांना जबाबदारी देण्याचा विचार करत आहेत, तर कोकाटेंकडे मदत व पुनर्वसन खातं सोपवण्याची शक्यता आहे.
कोकाटेंचा बचाव आणि कायदेशीर कारवाईचा इशारा: कोकाटेंनी रमी खेळल्याचा आरोप फेटाळून विरोधकांवर अब्रुनुकसानीचा खटला भरण्याचा इशारा दिला आहे, तसेच व्हिडिओ फसवणूक असल्याचं स्पष्टीकरण दिलं.
Mumbai News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील रमी गेम खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या चौफेर टीका होत आहे. माणिकराव कोकाटे(Manikrao Kokate) यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांचे सर्वच्या सर्व गंभीर आरोप फेटाळले होते. तसेच विरोधकांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करत त्यांना कोर्टात खेचण्याचा इशाराही दिला होता.(Despite controversy, Manikrao Kokate is unlikely to resign as Agriculture Minister. Ajit Pawar is considering Makarand Patil from Satara as a replacement in a strategic move to contain political damage)
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटेंवर मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दिवसेंदिवस दबाव वाढतच चालला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही (Ajit Pawar) कोकाटेंवर कारवाई करावी यासाठी दबाव असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यात कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी चर्चा सुरू असल्याचीही माहिती समोर येत आहे.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे अद्याप राजीनामा न देण्यावर ठाम आहे.तर दुसरीकडे अजित पवारांनी कोकाटेंच्या कृषिमंत्रीसाठी पुढचं नावही शोधल्याचं बोललं जात आहे. अजितदादा साताऱ्याचे मकरंदआबा पाटील यांच्याकडे कृषिमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू असताना विधानसभेत रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्री काढून घेण्यासाठी महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाते हे मकरंद पाटलांकडे सोपवले जाणार असल्याची विश्वसनीय चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महायुती सरकारमध्ये लवकरच खात्यांची अदलाबदल केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात विधानसभेत रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याचा पदभार काढून तो मकरंदआबा पाटील यांच्याकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे.
तर महायुती सरकारमध्ये सध्या मकरंद पाटील यांच्याकडे असलेले मदत आणि पुनर्वसन खात्याची जबाबदारी खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडे दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी होणारी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली आहे.
माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधाने केल्याने अजित पवार यांनी त्यांना अनेकदा समज दिली होती. मात्र, पुन्हा एकदा विधानसभेत रमी खेळतानाचे एकापाठोपाठ एक नवे व्हिडिओ समोर येत असल्यानं पक्षाची प्रतिमा डागाळली असून, याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अजित पवार कोकाटेंबाबत कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारमधील कृषिमंत्री मणिकराव कोकटेंचा राजीनामा घेण्यासाठी आता महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही राजकीय हालचाली सुरू झाल्याचं दिसून आलं होतं. महाविकास आघाडीचे खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, विशाल पाटील, प्रतिभा धानोरकर, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत यांच्यासह बजरंग सोनावणे यांनी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली होती.
यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषिमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने आणि वर्तणुकीमुळे चर्चेत असल्याची भूमिका चौहान यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या खासदारांनी मांडल्याचं समोर आलं होतं.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्हिडीओवरती खुलासा करताना ती फक्त जाहीरात आली होती, मला रमी गेम खेळताही येत नसल्याचं म्हटलं होतं. तसेच ऑनलाइन रमी काय माहीत आहे का. ऑनलाइन रमी खेळताना मोबाईल नंबर अटॅच पाहिजे. बँकेचं अकाऊंट अटॅच पाहिजे. अशाप्रकारचं कोणताही मोबाईल नंबर आणि अकाऊंट माझं अटॅच नाही असा दावाही कोकाटेंनी केला होता.
माझे बँकेचे अकाऊंट देणार आहे. कुठेही चौकशी करा. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मला रमी खेळता येत नाही. हा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आणि माझी बदनामी केली. त्यांना आपण कोर्टात खेचणार असल्याचा इशाराही कृषिमंत्र्यांनी विरोधकांना देत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
1. माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ नेमका काय होता?
विधानसभेत ते रमी गेम खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
2. माणिकराव कोकाटेंनी त्या व्हिडिओबाबत काय स्पष्टीकरण दिलं?
तो फक्त जाहिरात होती, मला रमी खेळताही येत नाही, असा दावा त्यांनी केला.
3. त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव कुणाकडून येतोय?
महायुतीतील काही नेते आणि अजित पवार यांच्याकडून कारवाईची मागणी आहे.
4. पुढील कृषिमंत्री म्हणून कोणाचे नाव चर्चेत आहे?
मकरंदआबा पाटील यांचं नाव पुढे येत आहे, जे सध्या मदत व पुनर्वसन मंत्री आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.