No Road No Vote : ‘रस्ता नाही तर मतदान नाही’; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मतदानावर बहिष्कार

Thane Constituency : मान्यता मिळून सुमारे आठ वर्षे उलटल्यानंतरही सेवारस्ता तयार करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल प्रशासनाकडून झालेली नाही. त्यामुळे प्रवासात नागरिकांचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींचा अपव्यय होत आहे.
No Road No Vote  movement
No Road No Vote movementsarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात सुमारे 25 हजार ठाणेकर नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील रुस्तमजी अर्बेनिया गृहसंकुलातील रहिवासीयांनी एकत्र येत ‘रस्ता नाही तर मतदान नाही’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) वेळी उमेदवारांची धाकधूक वाढणार आहे.

No Road No Vote  movement
Ramdas Kadam News : '…तर मी निवृत्त होईन', श्रीकांत शिंदेंच्या मदतीला रामदास कदम धावले

ठाण्यातील (Thane) साकेत पुलाजवळ रुस्तमजी अर्बेनिया नावाचे गृहसंकुल आहे. या गृहसंकुलामध्ये सुमारे 25 ते 30 मजल्यांच्या अनेक इमारती आहेत. घोडबंदरच्या तुलनेत ठाणे स्थानक, मुंबई नाशिक महामार्गापासून जवळचा भाग असल्याने 2014 नंतर अनेकजण या गृहसंकुलामध्ये वास्तव्य करण्यास आले. सध्या या भागात साकेत काॅम्प्लेक्स आणि रुस्तमजी अर्बेनिया या दोन्ही गृहसंकुलाच्या सुमारे ५ हजार सदनिकाधारक असून, सुमारे २० ते २५ हजार नागरिक या भागात वास्तव्य करतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या भागातून एक सेवारस्ता माजिवडा आणि राबोडीला जोडणारा केला जाणार आहे, असे सदनिका खरेदी करताना सदनिकाधारकांना सांगण्यात आले होते. मुंबई नाशिक महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांना गृहसंकुलाचा रस्ता जोडला जात असल्याने तसेच ठाण्यापासून जवळचा भाग असल्याने येथे सदनिका खरेदी केल्या. येथे मोठ्या प्रमाणात रहिवाशी वास्तव्यास येऊ लागल्याने ठाणे महापालिकेने साकेत ते ऋतु इस्टेटचा 15 मीटर रुंद सेवारस्ता तयार करण्याचे ठरले होते.

विकास आराखड्यानुसार रस्ता तयार केला जाणार होता. मान्यता मिळून सुमारे आठ वर्षे उलटल्यानंतरही सेवारस्ता तयार करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल प्रशासनाकडून झालेली नाही. त्यामुळे प्रवासात नागरिकांचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींचा अपव्यय होत असल्याने रहिवासीयांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. येथील नागरिकांनी एकत्र येत ‘रस्ता नाही तर मतदान नाही’ अशी भूमिका घेतली.

No Road No Vote  movement
Parbhani Loksabha Constituency : ओबीसी उमेदवार देण्याची मागणी करणाऱ्या आंबेडकरांनीच अखेर यू टर्न घेतला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com