Thane Lok Sabha Election 2024 : ठाण्याच्या उमेदवारीवरून बालपणीच्या मित्रांमध्ये तू-तू-मैं-मैं

Pratap Sarnaik Marathi News : "सरकारनं केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही मत मागण्यासाठी मतदारांपर्यंत जात आहोत," असं सरनाईकांनी म्हटलं.
jitendra awhad pratap sarnaik
jitendra awhad pratap sarnaiksarkarnama
Published on
Updated on

ठाणे लोकसभा मतदारसंघातून ( Thane Lok Sabha Election 2024 ) महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) असतील, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी व्यक्त केलं आहे. यामुळे चर्चांना उधाण आलेलं. यावर आता प्रताप सरनाईक यांनी भाष्य केलं आहे. "जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या शुभेच्छा, मी उमेदवार म्हणून नाही तर, मित्र म्हणून स्वीकारतो. पण, जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांनी 'पॉवर ऑफ ॲटर्नी दिली का?' याची मला कल्पना नाही," असा टोला प्रताप सरनाईक यांनी लगावला आहे.

प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) म्हणाले, "जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी दिलेल्या शुभेच्छा, मी उमेदवार म्हणून नाही तर, मित्र म्हणून स्वीकारतो. त्यांनी मला शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांच्या उमेदवाराला शुभेच्छा दिल्या असत्या तर अधिक बरं झालं असतं. आव्हाड यांची काय ईच्छा ही मला अधिक माहिती आहे. कारण, मी त्यांचा लहानपणीचा मित्र असल्यानं मला त्यांचा चांगला अनुभव आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांना 'पॉवर ऑफ ॲटर्नी दिली का?' याची मला कल्पना नाही. ठाणे लोकसभेची उमेदवारी मुख्यमंत्री आणि महायुतीचे वरिष्ठ नेते ठरवतील. सरकारनं केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही मत मागण्यासाठी मतदारांपर्यंत जात आहोत," असं सरनाईक यांनी सांगितलं.

jitendra awhad pratap sarnaik
Jitendra Awhad : 'ठामपा'च्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? शरद पवार गटाचा अजित पवार गटावर निशाणा

"आमचा उमेदवारी जरी ठरत नसला तरी आमचा पक्ष आणि उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. संभाव्य उमेदवार म्हणून यादी मोठी आहे. जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. महायुतीचा उमेदवार येत्या गुढीपाडव्यापर्यंत जाहीर होईल. गुढीपाडव्याला महायुतीच्या नावानं उमेदवार गुढी उभारणार," असा विश्वास सरनाईकांनी व्यक्त केला.


( Edited By : Akshay Sabale )

R

jitendra awhad pratap sarnaik
Jitendra Awhad News : अजितदादा श्रीकांत शिंदेंना पाडायचं काम करतात; कसं ते जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com