Sanjay Raut Arrest warrant : संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

संजय राऊत यांनी १०० कोटींच्या शौचालय घोटाळा प्रकरणी मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले होते.
Sanjay Raut News, Maharashtra Political News, Shivsena News
Sanjay Raut News, Maharashtra Political News, Shivsena Newssarkarnama

Sanjay Raut - Medha Somaiya News : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjya Raut) यांच्या विरोधात शिवडी न्यायदंंडाधिकारी कार्यालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज शिवडी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

मेधा सोमय्यांच्या याचिकेवर सुनावणी वेळी संजय राऊत सातत्याने गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट जारी केले आहे. पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी आहे. या सुनावणीला जर राऊत हजर झाले तर कदाचित हे वॉरंट रद्द होऊ शकते, असेही बोलले जात आहे.

Sanjay Raut News, Maharashtra Political News, Shivsena News
Lokayukta Bill : शिंदे-फडणवीसांना अपयश : 'लोकायुक्त' रखडल्याचे 'हे' आहे कारण..

संजय राऊत यांनी १०० कोटींच्या शौचालय घोटाळा प्रकरणी मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. यावर मेधा सोमया यांनी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यावरुन मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांना नोटीस बजावली होती. ४८ तासांत माफी मागा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला होता. त्याच बरोबर राऊत यांनी केलेला 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप बदनामीकारक असून ते पूर्णपणे खोटे आहेत, असा दावा केला आहे.

काय आहे १०० कोटी शौचालय घोटाळा प्रकरण

मुंबईतील मिरा भाईंदरमध्ये एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट देण्यात आलं होतं. पण मेधा सोमय्या यांनी बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना फसवून महापालिकेकडून साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीत असताना आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणाची तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मीरा भाईंदरमध्ये ज्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आलेल्या जागांची पाहणी वनविभागाने सुरु केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com