North West Mumbai Exit Poll : अमोल कीर्तीकर ठाकरेंची शान राखणार; उत्तर पश्चिम मुंबईत मुख्यमंत्री शिंदेंना धक्का

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ED च्या भीतीने शिंदे गटात आल्याचे वायकरांनी स्पष्ट केले होते. तसेच गजानन कीर्तीकर निवडणुकीत निष्क्रिय राहिल्याचा फटका शिंदे गटाला बसल्याची चर्चा आहे.
Amol Kirtikar Vs Ravindra Waikar
Amol Kirtikar Vs Ravindra WaikarSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : शिवसेनेत फूट पडल्यानंतर माजी खासदार गजानन कीर्तीकर शिंदे गटात तर त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर ठाकरे गटात राहिले. ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना थेट लोकसभेच्या रिंगणातच उतरवून शिंदे गटावर कुरघोडी केली. तोच डाव आता ठाकरेंच्या पथ्यावर पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. टीव्ही ९ पोलस्ट्राट एक्झिट पोलनुसार अमोल कीर्तीकर बाजी मारणार असून शिंदे गटाचे रवींद्र वायकर पराभूत होतील, असा अंदाज वर्तवला आहे.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 17 लाख 35 हजार 88 मतदार आहे. त्यातील साडेनऊ लाख मतदान झाले आहे. ही एकूण टक्केवारीच्या 54.84 आहे. आता येथून एक्झिट पोलनुसार कीर्तीकरांचा विजय होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर होताच या मतदारसंघातून ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर केली. तर अर्ज भरण्यापूर्वी दोन दिवस आधी शिंदे गटाकडून रवींद्र वायकरांना रिंगणात उतरवण्यात आले. येथेच शिंदे गटाला पहिला धक्का बसल्याची चर्चा होती. तसेच येथून माजी खासदर गजानन कीर्तीकरांनी निष्क्रिय राहिले. याचा अप्रत्यक्षपणे अमोल कीर्तीकरांना फायदा झाल्याचे बोलले जात आहे.

Amol Kirtikar Vs Ravindra Waikar
Ajit Pawars NCP Exit Poll: अजितदादांचं बंड महाराष्ट्राला रुचलं नाही? 'एक्झिट पोल'मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी एक जागा...

लोकसभा निवडणुकीत वायकरांचा उत्साह दिसून आलेला नाही. यातच त्यांनी ईडीची कारवाई टाळण्यासाठी आपण शिंदे गटात आल्याचेही सांगून टाकले. येथून भाजपच्या नेत्यांनीही अंग झटकून काम केल्याचे दिसून आले नाही. तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह मविआतील नेत्यांनी अमोल कीर्तीकरांसाठी संपूर्ण ताकद लावली होती. यातूनच अमोल कीर्तीकर शिंदेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंची शान राखणार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Amol Kirtikar Vs Ravindra Waikar
Pune Lok Sabha Exit Poll : पुणे ना रवीभाऊंचे, ना वसंततात्यांचे; मुरलीअण्णांचे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com