शेअर बाजाराच्या माजी प्रमुखांना न्यायालयाचा दणका; तिहार कारागृहातील मुक्काम वाढला

शेअर बाजाराच्या प्रमुखांना गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयकडून अटक
NSE Former CEO Chitra Ramkrishna News, NSE Scam News Updates,
NSE Former CEO Chitra Ramkrishna News, NSE Scam News Updates, Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली होती. न्यायलयाने त्यांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला. त्यामुळे त्यांचा तिहार कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. रामकृष्ण यांच्यासोबत शेअर बाजाराचे माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचा जामीनही न्यायालयाने नामंजूर केला आहे. (Share Market News)

चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयने 6 मार्चला अटक केली होती. सुरवातीला त्या सीबीआय कोठडीत होत्या. नंतर त्यांची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत झाली. सध्या त्या तिहार कारागृहात आहेत. रामकृष्ण यांच्यासोबत या प्रकरणी माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम यांनाही सीबीआयने अटक केली होती. या दोघांनी जामिनासाठी सीबीआय न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने या दोघांनाही दणका देत त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. यामुळे दोघांचाही तिहार कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

दरम्यान, मागील सुनावणीवेळी रामकृष्ण यांनी घरचे जेवण मिळावे, अशी मागणी न्यायालयात केली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. तुम्ही व्हीआयपी कैदी नाही. प्रत्येक कैदी समान आहे, असेही न्यायालयाने फटकारले होते. त्यांना हनुमान चालिसा आणि भगवद्गीता या ग्रंथांची प्रत जवळ बाळगण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. (NSE Former CEO Chitra Ramkrishna News)

NSE Former CEO Chitra Ramkrishna News, NSE Scam News Updates,
मोठ्या राजकीय नाट्यानंतर माजी केंद्रीय मंत्र्यांची विधानसभेत एंट्री अन् म्हणाले...

सुरवातीला रामकृष्ण यांच्यावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. नंतर त्यांची सीबीआयने चौकशी केली होती. रामकृष्ण यांच्या भोवतीचा केंद्रीय तपास यंत्रणांनी फास आवळला होता. सीबीआयने रामकृष्ण यांच्यासह एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण आणि माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावली होती. रामकृष्ण यांच्या संपत्तीसह कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती.

NSE Former CEO Chitra Ramkrishna News, NSE Scam News Updates,
राज्यपालांनी टाकला तिढा अन् अखेर 25 दिवसांनी आमदाराला घ्यावी लागली शपथ

या प्रकरणी ‘एनएसई’चे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम (Anand Subramanian) यांना सीबीआयने 24 फेब्रुवारीला अटक केली आहे. सीबीआयने त्यांची तीन दिवस चौकशी केली होती. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. चित्रा रामकृष्ण यांनी सांगितलेला तोच कथित योगी असल्याचेही स्पष्ट झाले होते. तोच योगी बनून चित्रा यांच्याशी ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधत होता. सुब्रह्मण्यम यांची एनएसईमध्ये नियुक्ती ही चित्रा यांनी योगीच्या सांगण्यावरून केली होती. तसेच, त्याला वेतन देतानाही अनियमितता असल्याचे सेबीच्या चौकशीत समोर आलं होतं. (Share Market Updates)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com