Omi Kalani : ओमी कलानींच्या आमदारकीचा गोव्यातून निर्णय; उल्हासनगरमध्ये घडामोडींनी वेग

Ulhasnagar Vidhan Sabha : कलानींच्या अपक्ष किंवा शरद पवार गटाकडून उमेदवारीच्या चर्चेसाठी काँग्रेसचे नेते
Omi Kalani
Omi KalaniSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभर विधानसभेची चाहुल लागलेली आहे. उमेदवारांच्या यादीत आपली वर्णी लागण्यासाठी अनेक जण विविध मार्गाने प्रयत्न करताना दिसत आहेत. उल्हासनगर विधानसभेतून ओमी कलानींनी आपली यंत्रणा कामाला लावली आहे.

याबाबत कोअर कमिटीची गोव्यात झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. आता कलनी हे अपक्ष निवडणूक लढवणार की शरद पवार Sharad Pawar गटाकडून याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

गोवा येथे झालेल्या कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते माजी जिल्हाध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला, तर पप्पू कालानी Pappu Kalani हे मार्गदर्शक होते. दरम्यान, ओमी कालानी यांच्या पत्नी पंचम कालानी या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. तर ओमी कलानी यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांच्या सोबत मैत्रीचे संबंध आहेत. त्यातून पंचम कलानी यांनी लोकसभेत 'दोस्ती का गठबंधन' या बॅनरखाली डॉ. शिंदे यांचा प्रचार केला होता.

लोकसभेपूर्वीच 'टीम ओमी कालानी'चे सर्वेसर्वा ओमी कालानी Omi Kalani यांनी उल्हासनगर विधानसभेतून रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती. अलीकडेच ओमी यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यानुसार त्यांना पवार यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर अपक्ष निवडणूक लढवणार असेही कलानी यांनी स्पष्ट केले आहे.

Omi Kalani
Raj Thackeray on Sharad Pawar : पवारसाहेब, महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला हातभार लावू नका! ठाकरे असे का म्हणाले?

कालानी कुटुंबातून पप्पू कालानी यांनी चार वेळा, दिवंगत ज्योती कालानी यांनी एकदा आमदार पद भूषवले आहे. यावेळेस ओमी कालानी यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणशींग फुंकले असून त्यासाठी खास गोव्यामध्ये बैठक पार पडली.

या कोअर कमिटीत पदाधिकारी नरेंद्र कुमारी ठाकुर, सुमित चक्रवर्ती, पीतू राजवानी, नोनी धामेजा, नरेश दुर्गानी, ओमी कालानी, संजय सिंह चाचा, सत्यन पूरी, राजेश टेकचंदानी, अजीत माखीजानी, मनोज लासी, शिवाजी रगडे, मनीष वाधवा, मोनू सिद्दीकी, संतोष पांडे, पंचम ओमी कालानी, कमलेश निकम, आनंद शिंदे, होशियार सिंह लबाना यांचा समावेश आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Omi Kalani
Aaditya Thackeray : पुणे उद्ध्वस्त होण्यामागे आदित्य ठाकरेंनी सांगितलं गुजरात कनेक्शन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com