Kalyan Dahi Handi Utsav : कल्याण शिवाजी चौकात दहीहंडीसाठी शिंदे गटालाच परवानगी ; ठाकरे गटाला पर्यायी जागा शोधण्याचे न्यायालयाचे आदेश

Shivsena News : कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवास परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटामध्येच चढाओढ लागली होती.
Eknath Shinde, Uddhav Thackeray News
Eknath Shinde, Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivli News : कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवास परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटामध्येच चढाओढ लागली होती. पोलिसांनी शिंदे गटास परवानगी दिल्यानंतर ठाकरे गटाकडून याचा निषेध नोंदविण्यात आला होता. हा वाद पुढे उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने शिंदे गटास परवानगी दिली असून ठाकरे गटाला शिवाजी चौक पासून 100 मीटरवर पर्यायी जागेवर दहीहंडी साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता शिवाजी चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दरवर्षी शिवसेना शाखेकडून दहीहंडी साजरी केली जाते. या वर्षी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट या दोन्ही गटाकडून पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी (Police) शिंदे गटाला परवानगी दिली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगाने ज्या पक्षाला नाव दिले आहे. ते ग्राह्य धरुन त्याला परवानगी दिली. तर ठाकरे गटाला अन्य कोणती जागा सूचवा असे सांगितले होते. यावरून शिंदे गटात आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप केल्याचे पहायला मिळाले होते.

Eknath Shinde, Uddhav Thackeray News
Amravati BJP News : अमरावतीत आजपासून भाजपची ‘मेरी माटी मेरा देश’ अमृत कलश यात्रा सुरू…

कल्याणमधील छत्रपती शिवाजी चौकात दहीहंडीसाठी शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाला परवानगी दिल्या नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे सचिन बासरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालयाने शिवाजी चौक येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यास शिवसेना शिंदे गटास परवानगी दिली. तसेच ठाकरे गटास शिवाजी चौक पासून 100 मीटर दूर पर्यायी जागेवर दहीहंडी साजरी करण्याचे आदेश दिले.

न्यायालयाच्या या आदेशाने शिंदे गटात आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. शहर प्रमुख रवी पाटील, अरविंद म्हात्रे यांसह अनेक शिवसैनिकांनी शिवाजी चौकात जमून एकमेकांना पेढे भरवत या निकालाचे स्वागत केले. याविषयी शिंदे गट कल्याण शहर प्रमुख रवी पाटील म्हणाले, 2008 पासून अरविंद मोरे हे शहर प्रमुख होते तेव्हापासून या दहीहंडी उत्सवाची परंपरा येथे सुरू झाली आहे. आणि ती आजतागायत आहे. न्यायालयास आमच्या वतीने सांगण्यात आले की, पंधरा वर्षे शिवसेना या ठिकाणी दहीहंडी उत्सव करते.

Eknath Shinde, Uddhav Thackeray News
Pankaja Munde Jejuri : शिव-शक्ती परिक्रमेच्या तिसऱ्या दिवशी पंकजा मुंडेंनी घेतले जेजुरीच्या खंडोबारायाचे दर्शन...

प्रत्येक पक्षाने आपली अशी जागा निवडलेली आहे. सालाबाद प्रमाणे त्या ठिकाणी ते दहीहंडी उत्सव करत असतात. प्रशासनाकडे रीतसर अर्ज करून आम्ही परवानगी मागितली होती. मात्र, काही लोकांना जाणीवपूर्वक शिवाजी चौकात आम्हाला हंडी करू द्यायची नव्हती, असाच त्यांचा उद्देश होता. या उद्देशाने त्यांनी त्या जागेची मागणी केली. मात्र, न्यायालयाच्या आम्ही ते निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकून घेत आम्हाला न्याय दिलेला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com