
New Delhi News, 07 Feb : ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shivsena) 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून ते लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय या सर्व चर्चांना शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील दुजोरा दिला आहे.
"एखादं मिशन राबवायचं असताना ते सांगायचं नाही. पण अनेक लोक संपर्कात असून टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवेश होईल", असं म्हणत सामंत (Uday Samant) यांनी या चर्चांना दुजोरा दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
कारण या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व खासदारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. काही दिवसांपासून ठाकरेंचे 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
सध्या दिल्लीत केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे ठाकरेंचे सर्व खासदार दिल्लीत आहेत. हे सर्व खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्या घरी एकत्र आल्यानंतर ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या चर्चांना उत्तर देण्यासाठी ठाकरे गट सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे.
पत्रकारांनी ऑपरेशन टायगर अंतर्गत काही खासदार शिंदे गटात येणार असल्याच्या चर्चा आहेत, हे खरं आहे का? असा प्रश्न विचारताच उदय सामंत म्हणाले, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं आहे, त्यामुळे आम्हाला कोणतं मिशन राबवण्याची आवश्यकता नाही. कारण आता काही लोकांना कळून चुकलं आहे की, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली चालते. त्यामुळे अनेक लोक संपर्कात असून टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवेश होईल हे देखील निश्चित आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.