'दादा... काय म्हणाले ? मुख्यमंत्र्यांना शोधून आणा...!

ठाकरे सरकारला घेरण्याची तयारी करून आलेल्या विरोधकांनी सोमवारी सकाळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
Winter Session  2021

Winter Session  2021

ज्ञानेश सावंत

मुंबई : 'दादा... काय म्हणाले ? मुख्यमंत्र्यांना शोधून आणा...! अशी नारेबाजी करीत, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोमवारी पुन्हा विधीमंडळात येण्याची हाक दिली. विशेष म्हणजे, भाजपमधील दादा अर्थात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीच (Chandrakant Patil) ही घोषणा दिल्याने मुख्यमंत्री अधिवेशनला कधी येणार, याची चर्चा पुन्हा ऐकायला मिळाली.

अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरे सरकारला घेरण्याची तयारी करून आलेल्या विरोधकांनी सोमवारी सकाळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सरकारविरोधात जोरजोरात घोषणाबाजी करीत, विरोधकांनी विधान भवन दणाणून सोडले. त्यातील 'दादा, काय म्हणाले, मुख्यमंत्र्यांना शोधून आणा...' अशी घोषणा लक्षवेधक ठरली.

<div class="paragraphs"><p>Winter Session&nbsp; 2021</p></div>
अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव; के.सी पाडवींसह ५२ जण कोरोना पॉझिटीव्ह

अधिवेशनाला मुख्यमंत्री येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सरकारमधील बहुतांशी नेत्यांनी सांगितले. मात्र अधिवेनशच्या पहिल्या तीन दिवसांत मुख्यमंत्री ठाकरे आलेले नाहीत. तेव्हा ते कदाचित सोमवारी येतील, असे संकेत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या येण्याची उत्सुकता अधिवेशनात होती. त्याआधीच सोमवारीही मुख्यमंत्री येणार नसल्याचा अंदाज आलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी आपल्या आंदोलन मुख्यमंत्री ठाकरेंच्या दिशेने रोख ठेवला.

भाजपचे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, "विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांच्या जगण्यापर्यंत अनेक समस्या असूनही मुख्यमंत्री बेजबाबदारपणे काम करीत आहेत. अशा काळात त्यांनी लक्ष घालून राज्याला दिलासा देण्याची गरज आहे. परंतु, त्यांना शोधण्याची वेळ ओढवली आहे. " त्यानंतर भाजपच्या बहुतांशी आमदार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधून, सरकारविरोधात भूमिका मांडली, विधानसभेतही भाजपच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांना जशास तसे उत्तरे दिली. त्यामुळे सभागृहातही - सत्ताधारी विरोधकांत जुंपल्याचे पाहायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com