CM Eknath Shinde : 'मदतीचा हात एकनाथ' या फलकातून घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा पुन्हा एकदा खोटारडेपणा; आदित्य ठाकरे कडाडले !

Legislative Session 2024 : विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी आलेले युवा सनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभरात लागलेले 'मदतीचा हात एकनाथ' ह्या फलकावरून टीका केली.
Eknath Shinde  Aditya thackeray
Eknath Shinde Aditya thackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबईसह राज्यात 'मदतीचा हात एकनाथ', असे फलक लागले असून त्यावर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. 'घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा आणखी एक खोटारडेपणा फलकातून समोर येऊ लागला आहे', असा मार्मिक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

आदित्य ठाकरे विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी सोमवारी दुपारी मंत्रालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.महायुती सरकारने माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या योजनेचा अध्यादेश काढला. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबईसह राज्यभरात 'मदतीचा हात एकनाथ', असे फलक झळकले आहेत.

Eknath Shinde  Aditya thackeray
Eknath Shinde : CM शिंदेंची 'ऑर्डर' धडकली अन् कमिश्नर कैलाश शिंदे, राहुल गेठेंनी पब, बारचा काढला 'धूर'

यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री शिंदे, असे फलक लावून त्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जाहीर करत आहेत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लगेचच योजनेचा अध्यादेश काढला. त्यामुळे ही योजनेचे भवितव्य कसे असेल हे त्यांनाच माहीत.दहीहंडी उत्सवाला विमा संरक्षण देण्याची घोषणेत देखील खोटारडेपणा केला. या घटनाबाह्य सरकारमध्ये सर्वकाही खोटारडेपणावर सुरू असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

Eknath Shinde  Aditya thackeray
Sanjay Shirsat : शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंची शिंदेंच्या नेत्याकडून पाठराखण, म्हणाले,

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यभरातील लाभार्थी महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा मंत्रिमंडळात अध्यादेश निघताच सर्वत्र फलक लागलेत. या फलकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना प्रेझेंट करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकनाथ शिंदे असेल, असे हे फलक राज्यभर लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी प्रेझेंट केले जात असल्याची चर्चा आहे. या चर्चेच्या अनुषंगाने आदित्य ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com