शिवसेना जन्मायच्या आधी भाजपचा आमदार होता...

भाजपच्या सोबत असताना हे पहिल्या क्रमांकाचा पक्ष होते.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

मुंबई : सोयीचा इतिहास मांडणे आणि सोयीस्कर विसर या दोन बाबी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणात पाहायला मिळाल्या. भाजप-शिवसेना युतीचा निर्णय हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला. त्यांच्या निर्णयावर प्रश्न विचारून त्यांच्या जयंतीला अपमान का करता, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. (Devendra Fadnavis Criticize Shiv Sena)

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
फडणवीसांनी नाना पटोलेंसाठी काँग्रेसला दिला 'हा' सल्ला!

शिवसेनेचा जन्म होण्याआधी मुंबईत पहिला नगरसेवक आणि आमदार हा भाजपचा होता. लोकसभेची पहिली निवडणूक शिवसेनेने भाजपच्या चिन्हावर लढविली कशाला बाता मारता, असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावाला. भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले असे तुमचे म्हणणे आहे का असा सवाल आमच्या मनात येतो. भाजपच्या सोबत असताना हे पहिल्या क्रमांकाचा पक्ष होते. आता भाजप सोडल्यावर चौथ्या क्रमंकावर गेले. मग कोणासोबत सडले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात तेच ते मुद्दे आहेत. त्यांचे भाषण आता शिवसैनिकांना पाट झाले असेल. राम जन्मभूमिच्या आंदोलनात तुमचे कोण होते? भाषणाच्या पलिकडे तुमचे हिंदुत्व काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आनंद दिघेंनी संघर्ष केला. तुमचे हिंदुत्व हे कागदावरचे हिंदुत्व आहे. हिंदुत्व जगावे लागते, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, ''माझा चेहरा वापरला असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेसुद्धा म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंचाही चेहरा वापरला होता. त्यावेळी सगळे युतीमध्ये होते म्हणून सगळ्याचेच फोटो वापरले होते. १९९३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेने १८० उमेदवार उभे केले, १७९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. १९९६ मध्ये २४ पैकी २३ जागी २००२ सालच्या निवडणुकीत ३९ पैकी ३९ जागी शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले होते, असे फडणवीस यांनी सांगितले. म्हणे त्यावेळी लाट होती, कशाला खोटे बोलता, असा चिमटा फडणवीस यांनी काढला.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
बाळासाहेबांनी शिवसेना सडत ठेवली का?

शिवसेना जोवर आमच्यासोबत होती, तोवर पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होती. आज चौथ्या क्रमांकावर आहे. कुणासोबत युतीत सडले, हे दिसतेच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ना औरंगाबादचे- संभाजीनगर करता आले. ना उस्मानाबादचे- धाराशिव झाले. साधा मलंगगडचा प्रश्न यांच्याने सुटत नाही आणि हिंदुत्वाच्या गप्पा करतात, असेही फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com