Lok Sabha Election 2024: बविआच्या दबावामुळे महायुतीचा उमेदवार ठरेना, पालघरचा तिढा सुटेना

Palghar Lok Sabha Constituency : पालघरच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये बैठका होत आहेत. विद्यमान खासदार राजेंद्र गावित या जागेसाठी इच्छुक आहेत. गावित यांना घेऊन शिवसेना या जागेसाठी आग्रही आहे. मात्र, भाजपनेही आपल्या या पारंपरिक मतदारसंघावर दावा केला आहे.
Palghar Lok Sabha Constituency
Palghar Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Palghar Lok Sabha Election 2024: पालघर लोकसभेसाठीची महायुतीची उमेदवारी अद्याप घोषित झालेली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी (Bharti Kamdi) यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे. 'गावभेटी आणि आशीर्वाद' दौऱ्यांतून त्या सर्वांशी संपर्क साधत आहेत.

2 मे रोजी कामडी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर शिवसेना-भाजप (Shivsena-BJP) आपला उमेदवार 26 एप्रिल रोजी जाहीर करणार असल्याची माहिती आहे. या घोषणेनंतरच बहुजन विकास आघाडीदेखील (BVA) आपला निर्णय अंतिम करणार असल्याचे कळते आहे.

पालघर लोकसभेच्या (Palghar Lok Sabha) जागेबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये बैठका होत आहेत. विद्यमान खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) या जागेसाठी इच्छुक आहेत. गावित यांना घेऊन शिवसेना (Shivsena) या जागेसाठी आग्रही असल्याचं कळत आहे.

मात्र, भाजपनेही या पारंपरिक मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र त्यांच्याकडे उमेदवारीसाठीचा चेहरा नाही. त्यामुळे राजेंद्र गावित यांना पुन्हा प्रवेश देऊन भाजप ही जागा लढवू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या सगळ्या तर्कवितर्कांमध्ये उमेदवाराच्या घोषणेचे घोंगडं भिजत पडलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीने निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून महायुती व महाविकास आघाडी यांच्यावर अप्रत्यक्ष दबाव आणला आहे.

बहुजन विकास आघाडीच्या वाढत्या दबावामुळेही महायुतीची उमेदवार घोषणा लांबणीवर पडली असल्याचे म्हटले जाते. बहुजन विकास आघाडीचा खासदार राजेंद्र गावित यांच्या पर्यायाने शिवसेनेच्या उमेदवारीला विरोध आहे. किंबहुना भाजपने (BJP) या जागेसाठी बविआला पाठिंबा द्यावा, अशी आमदार हितेंद्र ठाकूर यांची इच्छा आहे.

शिवसेनेने ही जागा लढवल्यास भाजपच्या अंतर्गत विरोधाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. शिवाय बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. मात्र भाजपने ही जागा लढवल्यास बविआ या निवडणुकीतून अंग काढून घेईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

किंबहुना बविआच्या पाठिंब्याने त्यांना ही जागा जिंकणे सोपे जाऊ शकेल. पण त्यातही मेख आहे. बविआचा पाठिंबा मिळवायचा तर भाजपला पुन्हा राजेंद्र गावित यांना उमेदवारीपासून दूर ठेवावे लागणार आहे. त्याऐवजी बविआने त्यांच्याकडे असलेले चेहरेही अप्रत्यक्ष भाजपला सूचवलेले आहेत. पण भाजप हा पर्याय स्वीकारेल, ही शक्यता कमीच.

Palghar Lok Sabha Constituency
Thane Lok Sabha Election 2024 : ठाण्यात शिंदेंचा उमेदवार ठरला? जवळील आमदाराच्या व्हायरल पत्रानं खळबळ..!

त्यात महाविकास आघाडीने (MVA) भारती कामडी यांच्या रूपाने महिला उमेदवार देऊन या मतदारसंघांतील समीकरणे बदलली आहेत. महायुतीचा उमेदवार घोषित होत नसताना, भारती कामडी यांनी प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे.

आघाडीचा महिला चेहरा व त्यांची घोडदौड पाहता बहुजन विकास आघाडीदेखील महिला चेहरा देऊन महायुती; विशेषत: राजेंद्र गावित यांच्यासमोरील आव्हाने वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Palghar Lok Sabha Constituency
Satyajeet Tambe : विशाल पाटलांच्या बंडला सत्यजीत तांबेंची हवा; '...म्हणून उचलले पाऊल'

असे झाल्यास राजेंद्र गावित यांना आपसूकच आव्हान निर्माण होणार आहे. तशी शक्यता लक्षात घेतल्यास आपल्यासमोरील आव्हाने कमी करण्यासाठी महायुतीलाही महिला उमेदवाराचा पर्याय स्वीकारावा लागेल. त्यातून एकास एक महिला उमेदवारांत लढत होऊ शकेल.

पण महायुतीतील भाजप काय चाल चालणार, यावरच बविआचा अंतिम निर्णय अवलंबून असणार आहे. बविआच्या याच टेन्शनमुळे महायुतीही थेट आता 26 एप्रिल रोजीच उमेदवाराची घोषणा करेल. त्यातून बविआला निर्णयाकरता उसंत घेऊ देणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com