Palghar Loksabha Election News : पालघर लोकसभेसाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; प्रथमच आदिवासी महिलेला दिली संधी

Political News : पालघर लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने मोठा डाव टाकला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करीत आघाडी घेतली आहे. महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Election News: निवडणुकीमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण जाहीर झाले असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी वेळ लागणार आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाची स्थापना २००९ मध्ये झाली. त्यानंतर आतापर्यंत तीन वेळा निवडणुका पार पडल्या. मात्र, कुठल्याच राजकीय पक्षाने महिला उमेदवाराला संधी दिली नव्हती. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने मोठा डाव टाकला आहे. या मतदारसंघातून प्रथमच आदिवासी महिलेला संधी देण्याचे धाडस उद्धव ठाकरे यांनी दाखवले आहे. त्यामुळे येत्या काळात पालघर येथील निवडणूक चुरशीची होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मात्र माजी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी यांना उमेदवारी देऊन एक नवा पायंडा पाडला आहे. पालघर मतदारसंघावर यापूर्वी भाजपचे वर्चस्व होते. २००९ मध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघावर बविआचे बळीराम जाधव हे पहिले खासदार म्हणून निवडून आले. परंतु त्यानंतर झालेल्या पुढच्या निवडणुकीत भाजपने हा मतदारसंघावर परत आपले वर्चस्व मिळविले.

दरम्यानच्या काळात भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राजेंद्र गावित यांनी या ठिकाणी बाजी मारली होती. तर गेल्या निवडणुकीत शिवसेनेने पालघर मतदारसंघ युतीत आपल्याकडे घेतला. परंतु या निवडणुकीत उमेदवार म्हणून पुन्हा भाजपमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी देऊन निवडून आणले.

Uddhav Thackeray
Loksabha Election 2024 : नांदेडात आता 'अशोका'ची पतझड; अन् वसंत ऋतू सुरू...

दरम्यानच्या काळात शिवसेनेत फूट पडली आणि गावित यांनी पक्ष प्रमुखांची साथ सोडून एकनाथ शिंदे शिवसेनेला जवळ केले. पालघरमध्ये नेते शिंदे सेनेबरोबर गेले असले तरी कार्यकर्ते मात्र उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच राहिल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना आता अच्छे दिन दिसू लागले आहेत.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या भारती कामडी या सेनेच्या कट्टर शिवसैनिक असल्याने योग्य उमेदवाराला पक्षप्रमुखानी दिली आहे. आतापर्यंत पालघरमध्ये शिवसेना बाहेरच्या उमेदवाराला घेऊन पालघरची जागा लढवणार असे बोलले जात होते. त्यात काँग्रेसचे माजी खासदार दामू शिंगाडा यांचे पुत्र सचिन शिंगाडा यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेक चर्चा सुरू होत्या. परंतु, शिवसेनेने एका महिला कार्यकर्तीला उमेदवारी देऊन साऱ्या चर्चा बंद केल्या आहेत.

तब्बल 22 वर्षांहून अधिक काळ पक्षवाढीसाठी प्रयत्न

विक्रमगड (तलवाडा) सारख्या डोंगराळ दुर्गम भागात शिवसेनेची विजयी पताका फडकवण्याचे महत्त्वपूर्ण काम भारती कामडी यांनी केले आहे. तब्बल 22 वर्षांहून अधिक काळ त्यांनी शिवसेना पक्षवाढ आणि पक्ष बांधणीसाठी मेहनत घेतली आहे. 2014 पासून पालघर जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून त्या निवडून येत आहेत. 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. दीड वर्ष त्यांनी हे पद भूषवले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लस घेण्याबाबत केली जनजागृती

लोकाभिमुख कामांतून जिल्हा परिषदेवर भारती कामडी (Bharti Kamadi) यांनी आपला ठसा उमटवला आहे. कोविड-19 संक्रमण काळातही त्यांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. कोरोना लस घेण्याबाबत अनेक जणांत गैरसमज होते. आदिवासी तर लस घेण्यास तयार नव्हते. या पार्श्वभूमीवर भारती कामडी यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या समाज बांधवांत लस घेण्याबाबत जनजागृती केली होती. त्यांना लस घेण्यास प्रवृत्त केले होते. वाढवण बंदर प्रश्नावरही त्यांची ठाम भूमिका राहिली आहे. मच्छीमार, स्थानिक शेतकरी आणि अन्य नागरिकांसोबत राहण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे.

ठाकरे गटाचा एक आश्वासक चेहरा

पालघर जिल्ह्याची स्थापन होऊन दहा वर्षे झाली आहेत. हा जिल्हा विकासात मात्र मागे आहे. तरुणांचे रोजगारासाठीचे स्थलांतर, पैसा भरती अशा विविध मुद्द्यांवर त्या सातत्याने आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आल्या आहेत. पालघरमधील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम उद्धव ठाकरे करत असल्याची चर्चा पालघरमध्ये रंगत आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Uddhav Thackeray
Palghar LokSabha Constituency : तीन पराभवानंतर लोकसभेसाठी 'पालघर'मधून पुन्हा बळीराम जाधवांचे नाव चर्चेत!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com