Palghar Loksabha : विवेक पंडित-हितेंद्र ठाकूर एकत्र येणार? पालघर लोकसभेची समीकरण बदलणार...

Hitendra Thakur : विवेक पंडित- आमदार हितेंद्र ठाकूर हे एकत्र आले तर पालघर मतदारसंघातील सर्वच राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.
Vivek Pandit Hitendra Thakur
Vivek Pandit Hitendra Thakursarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : पालघर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून भारती कामडी यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. तर, महायुतीकडून ही जागा भाजप लढणार की शिंदे गट हे अजुनही स्पष्ट झाले नाही. मतदानासाठी अवघ्या एका महिन्याचा कालावधी राहिला आहे. मात्र, महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यात पालघर भागात आपल्या श्रमजीवी संघटनेची ताकद असणारे विवेक पंडित आणि वसई,विरार, नालासोपारा या भागात ताकद असणारे आमदार हितेंद्र ठाकूर यांना एकत्रीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालघरच्या विकासासाठी काही तरुणांकडून हे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Vivek Pandit Hitendra Thakur
Ajit Pawar On Narendra modi : 'मोदींनी पुतीनला फोन करून युद्ध थांबवलं', भर सभेत अजित पवारांनी काय सांगितलं?

विवेक पंडित- आमदार हितेंद्र ठाकूर हे एकत्र आले तर पालघर मतदारसंघातील सर्वच राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. पालघर लोकसभेतील निम्म्याहून अधिक मतदार हे वसई-विरार-नालासोपारा ह्या शहरी भागातील आहेत. महायुतीचे येथील विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांना सर्व्हेमध्ये डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा आहे. शिवाय ठाकरे गटाच्या भारती कामडी यांना सहानभुती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विवेक पंडित आणि हितेंद्र ठाकूर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडून या मतदारसंघात चाचपणी सुरू आहे. बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते आणि समन्वयक अजीव पाटील यांनी पक्ष लोकसभेची जागा लढविणार असल्याचे सांगिल्याने सर्वच तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळाला आहे. तर, महायुतीला मदत करणारे विवेक पंडित यांनी श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांना महायुतीचा उमेदवार पुढे करावे, अशी चर्चा आहे.

जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आपापसांतील वैर, हेवेदावे, पूर्वाश्रमीची कटुता दूर सारून केवळ लोककल्याणकारी संकल्पना अंमलात यावे, यासाठी बहुजन विकास आघाडी आणि श्रमजीवी संघटनेतील कार्यकर्त्यांना एकत्र येण्याबाबत विचार करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अॅड. प्रवीण बेबीताई रघुनाथ पाटील करत आहेत.

Vivek Pandit Hitendra Thakur
Shashikant Shinde VS Mahesh Shinde : घोटाळा केला असता तर आता भाजपमध्ये असतो; शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंना टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com