Ajit Pawar On Narendra modi : 'मोदींनी पुतीनला फोन करून युद्ध थांबवलं', भर सभेत अजित पवारांनी काय सांगितलं?

Amravati Loksabha : पाकिस्तान सारखं राष्ट्र वाकड्या नजरेन बघायचं. पुलमाच्या निमित्ताने पाकिस्तानचं पेकाटच मोडून टाकलं, असे अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar Narendra modi
Ajit Pawar Narendra modisarkarnama

Loksabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया युक्रेन युद्ध थांबवल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येतो. या विषयी जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, या जाहिरातीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. आता अमरावतीच्या नवनीत राणांच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतातील मुलांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे.

Ajit Pawar Narendra modi
Lok Sabha Election 2024 : उमेदवार अजितदादांचा अन् निवडून आणण्यासाठी शर्यत लागली फडणवीसांच्या आमदारांमध्ये

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ''मधल्या काळामध्ये युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध झालं. तुम्हाला अमरावतीकरांनो माहित नाही. युक्रेनमध्ये आपले बरेचशे मेडीकलचे विद्यार्थी शिक्षण घेत होते.अचनाक युद्ध पेटलं. मुलांना परत आणायचं कसं. महाराष्ट्रात पालक आम्हाला फोन करत होते. इतर राज्यातले लोकं परराष्ट्र मंत्रालयाला फोन करायचे. ते सगळं मोदी (Narendra Modi) साहेबांनी बघितलं. त्यांनी डायरेक्ट पुतीनला फोन केला आणि सांगितलं माझ्या मुलांना मुलींना परत भारत घेऊन यायचंय. त्या काळ करता युद्ध थांबलं पाहिजे. आपली विमानं जायची मुला-मुलींना घेऊन यायची. त्यावेळेस युद्ध थांबलेलं असायचं.'

मोदी हे कणखर नेते असल्याचे अजित पवारांनी सांगत पाकिस्तानला देखील मोदींनी धडा शिकवल्याचे म्हटले. 'पाकिस्तान सारखं राष्ट्र वाकड्या नजरेन बघायचं. पुलमाच्या निमित्ताने पाकिस्तानचं पेकाटच मोडून टाकलं. परत काय पाकिस्तानने आवाज काढला नाही. अशा पद्धतीने एक कर्तबगार नेता आपल्याला मोदी साहेबांच्या रुपाने मिळालेला आहे.', असे अजित पवार म्हणाले.

महायुतीला मत म्हणजे मोदींना मत

नवनीत राणा यांना मतदान करण्यासाठी घड्याळाला मतदान करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. मात्र, आपली चूक लक्ष्यात येताच त्यांनी सारवासारव केली. मागील दोन सभेत घड्याळाच्या उमेदवाराचा प्रचार करून आल्या तो शब्द तोंडात आला. महायुतीची कमळ, घड्याळ, धनुष्यबाण, शिट्टी ही चिन्ह जिथे कुठं असतील त्यांच बटन दाबलं की ते मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मिळणार आहे, असे देखील अजित पवार म्हणाले.

2014 ला सत्तेत जाणार होतो...

2014 ला भाजप सरकारला आम्ही बाहेरुन पाठींबा दिला. आम्हाला सांगण्यात आलं काही दिवसांनी आपल्याला त्या सरकारमध्ये जायचे आहे. पण कुठं काय खटलं माहीत नाही. वरून आदेश आले. आम्ही त्याची अमंलबजावणी करायचो, असे अजित पवार म्हणालो.

Ajit Pawar Narendra modi
Shashikant Shinde VS Mahesh Shinde : घोटाळा केला असता तर आता भाजपमध्ये असतो; शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंना टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com