Pasha Patel News : महायुती सरकारचं पाशा पटेलांना 'हे' मोठं गिफ्ट...

Maharashtra Political News : देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यमंत्रिपदाचा दर्जा
Pasha Patel
Pasha PatelSarkarnama

Mumbai Political News : राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. भाजपमध्ये गेली अनेक वर्षे पडद्याआड असलेल्या पटेल यांची नाराजी घालविण्यासाठी त्यांना पुन्हा कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही त्यांना आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यावेळी त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता.

भाजपचे शेतकरी नेते पाशा पटेल यांना देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात २०१७ मध्ये राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, राज्यातील सत्ताबदलानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वच महामंडळे बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pasha Patel
Dhangar ST Reservation : पुन्हा तोच घोळ ! जरांगेंनंतर धनगर आरक्षणातही मुदतीचे कन्फ्यूजन ? सरकार म्हणतं...

शिवसेनेतील फुटीनंतर महायुतीचे सरकार येऊनही आयोगावर नियुक्ती होत नसल्याने पटेल नाराज होते. अखेर ऑक्टोबर २०२३ मध्ये पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आली होती. पटेल यांच्यासारखा आक्रमक नेता आयोगावर नियुक्ती होऊनही अस्वस्थ होता. त्यामुळे त्यांना बढती देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मागील कार्यकाळात त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. या वेळी त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आाला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतीत काय योगदान दिले, असा प्रश्न उपस्थित केला होता. 'या प्रश्नावर विचार करावा लागणार,' असा घणाघात पाशा पटेलांनी केला होता. ते म्हणाले होते, 'पवारांना शेतीतील जास्त कळते, असे म्हणतात. केंद्रीय कृषिमंत्री म्हणून शरद पवारांनी दहा वर्षे काम केले तरी गावागावांतील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता का आहे ? त्यांनी ७० वर्षांत ७० हजार कोटींची कर्जमाफी केल्याचे सांगतात. मात्र, मोदी दरवर्षी तेवढी रक्कम देतात,' असेही पटेल म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Pasha Patel
Karmala-Madha Politics : माढा - करमाळ्यात मोहिते पाटील अन् नारायण पाटील 'बॅकफूट'वर ?; संजयमामांच्या मतांचा टक्का वाढला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com