Pathan Movie : मागील काही दिवसांपासून देशात बायकॉट (Bycott) बॉलिवूड हा ट्रेंड काही जणांकडून सोशल मीडियावर चालू होता. या ट्रेंडचा धसका अनेक बॉलिवूडचे निर्माते, अभिनेते व सिनेमांनी घेतला. याचा परिणाम अनेक बॉलीवूड (Bollywood) चित्रपटांना बसला. मात्र या बायकॉट (Bycott) बॉलिवूड हा ट्रेंडवर पठाण (Pathan) सिनेमाने दणदणीत मात करून बाक्स ऑफिस कलेक्शनचा नवा विक्रम रचला आहे.
पठाण हा सिनेमा बुधवार २५ जानेवारी रोजी प्रदर्शन झाला होता. सार्वजनिक सुट्टी नसतानाही या सिनेमाने छप्परफाड कमाई केली आहे. पठाण सिनेमाने२५ तारखेला पहिल्या दिवशी ५५ कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट इतिहासातलं सर्वात मोठी पहिल्या दिवशीची कमाई ठरली आहे. पठाणने केजीएफ, वार, ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमांना मागे टाकत, हा नवा विक्रम घडवला आहे. चित्रपट व्यवसाय समिक्षक तरण आदर्श यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. यामुळे बॉयकॉट गँगची हवाच निघून गेली आहे.
या सिनेमाला बायकॉट करण्यासाठी सोशल मीडियावर ट्रेंड चालवण्यात येत होता. काही तथाकथित हिदूत्ववादी संघटनांनी याबाबत चळवळ चालवली होती. पठाणमधील 'बेशरम रंग' या गाण्यावरही आक्षेप काही हिंदुत्ववाद्यांनी घेतला होता. याबाबत राजकीय पक्ष, संघटना, नेते या सगळ्यांमध्ये त्यावर गरमा गरम चर्चा सुरू होती. `कुर्सीकी पेटी बांध लो, मौसम बिगडने वाला है` याचा प्रत्यय त्यातून येत होता. याबाबत अनेक तक्रारी आल्याने सेन्सॉर बोर्डाने देखील चित्रपटात काही बदल सुचवले होते. त्यामुळे हा चित्रपट चालेल का याबाबत साशंकता होती.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुंबई शहरात विविध घटकांशी बैठक घेऊन चर्चा केली होती. यावेळी देखील अभिनेता सुनील शेट्टी यांनी `बायकॉट ट्रेंड` विषयी चिंता व्यक्त केली होती. अभिनेता अमीर खान यांच्या लालसींग चढ्ढा सिनेमाला या ट्रेंडची झळ बसली होती. मात्र अॅक्शनपट पठाणने त्यावर दणदणीत मात करत कमाईचा नवा विक्रम रचला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.