आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावर पवारांनी सरकारला फटकारले

जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्या आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावर राज्यभर टिका झाली होती.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama

मुंबई : आमदारांना घरे देण्याचा राज्य सरकारचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय विधानसभेत जाहीर केला होता. यावरुन राज्यभरात टीकेची झोत उठली. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारला फटकारले आहे. पवार यांनी फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.

पवार म्हणाले, केवळ आमदारांसाठी गृहनिर्माण योजना नको. गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये आमदारांसाठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, हे घर देतांनाही त्याची योग्य किंमत घेतली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयाबाबत पवार पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्वत:च सांगितले.

Sharad Pawar
आमदार प्रणिती शिंदे म्हणतात, मोफत घर नको रे बाबा...

दरम्यान, मुंबईत आमदारांसाठी कायमस्वरूपी घरे देण्यात येतील, अशी घोषणा आव्हाड यांनी केली होती. आव्हाड यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वसामान्यांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली गेली. सर्वसामान्य वर्षानुवर्षे घर मिळाव यासाठी म्हाडाकडे अर्ज करत असताना आधीच इतके श्रीमंत असणाऱ्या आमदारांना मोफत घरे कशासाठी, अशी विचारणा केली जात होती. या निर्णयानंतर महाविकास आघाडीसह भाजपच्याही (BJP) आमदारांनी त्यावर आक्षेप घेतला होता. अनेकांनी आम्हला घर नको असी भूमिका घेतली होती.

Sharad Pawar
Krishna Prakash यांच्या नावे पोलिसांकडूनच खंडणी उकळणाऱ्या तोतया पीआयला पकडले..

या सर्व गदारोळानंतर जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले होते. आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होत आहे. मी स्पष्ट करतो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे, असे आव्हाड म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com