हर्षवर्धन पाटलांसारखे लोकं भाजपचे ब्रँड ॲम्बेसिडर झाले पाहिजेत

छापा टाकायचा आणि काटा काढायचा, हे जादा दिवस चालणार नाही.
Uddhav Thackeray-Harshvardhan Patil
Uddhav Thackeray-Harshvardhan Patil Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात का गेलो? हे एका कार्यक्रमात जाहीरपणे अनावधानाने बोलून गेले. पण, अशी लोक भाजपची ब्रँड ॲम्बेसिडर झाले पाहिजेत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप व त्या पक्षांत जाणाऱ्यांवर जोरदार फटकारे ओढले. (People like Harshvardhan Patil should become BJP's brand ambassadors : Uddhav Thackeray)

विजयादशमीच्या निमित्ताने षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या वतीने दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनेचा आणि आमचा आवाज दाबणारा अजून जन्माला येऊ शकत नाही. शिवसेनेची १९६६ पासून आभिमानास्पद वाटचाल सुरू आहे. शिवसैनिक हे आमचे शस्त्र आहे. हर हर महादेवची ताकद दाखवयाची वेळ आली तर ती दिल्लीच्या तख्ताला दाखवावी लागेल. छापा टाकायचा आणि काटा काढायचा, हे जादा दिवस चालणार नाही.

जे लोक भाजपत गेले आहेत, ते त्या पक्षाचे ब्रॅंड ॲम्बेसेडर झाले पाहिजेत. (दूरचित्रवाणीवरील जाहिरात संदर्भ देत ते म्हणाले की पहिले मुझे नींद नही अती थी. फिर रोंगटे खडे होते ते...त्याला जोडून ते म्हणाले की फिर किसने कहा तुम भाजपमें जाव. भाजपमें जाकर मैं कुंभकर्ण की तरहा सोता हू.. दरवाजे पे ठोका तोभी उठता नही हूं). ही काय लायकाची माणसे आहेत आणि आपल्याला आव्हानं देताहेत. हिम्मत असेल तर अंगावर या. पण, तुमची पात्रता तरी आहे का, असा सवाल त्यांनी भाजपला केला.

Uddhav Thackeray-Harshvardhan Patil
गृहमंत्रीपद म्हटलं की माझा बीपी वाढतो...गृहमंत्री नियुक्तीचा अजितदादांनी सांगितला किस्सा!

स्वतःमध्ये धमक, हिम्मत असेल तरच अंगावर या. ईडी, सीबीआय, इन्मक टॅक्सच्या माध्यमातून येऊ नका. मीसुद्धा शिवसैनिकांच्या माध्यातून तुम्हाला आव्हान देईन; अन्यथा आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या पदराआड लपायचं, हे मर्दाचं लक्षण नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी ईडी व सीबीआयच्या होणाऱ्या कारवायांवर भाष्य केले.

Uddhav Thackeray-Harshvardhan Patil
माझ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असते तर मी राजकीय निवृत्ती घेतली असती...

मी मुख्यमंत्री आहे, असे वाटू नये तर कुटुंबातील सदस्य आहे. काहींना वाटत. पद येतील सत्ता येईल जाईल. अहमपणा डोक्यात जाऊ देऊ नकोस हा आमचा संस्कार आहे. आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. बंगालप्रमाणे एकत्र या. हिंदुत्व आता खरे धोक्यात आहे; म्हणून बंगालप्रमाणे तुमची तयारी आहे? (प्रचंड प्रतिसाद) मराठी-अमराठी भेद करु नका. मराठी म्हणून एक व्हा; मराठा तितुका मेळवावा प्रमाणे हिंदुत्वसुध्दा वाढवा, असे आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com