उद्धव ठाकरे गटाला मुंबईतून जनताच हद्दपार करेल : भाजप प्रवक्त्याची टीका

Atul Bhatkhalkar : "उद्धव ठाकरे साहेब कोरोनाकाळात घरामध्ये कडी लावून बसला होतात."
Atul Bhatkhalkar
Atul BhatkhalkarSarkarnama

मुंबई : शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा घेतला. यावेळी ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टिका केली. यावर आता भाजपच्या विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 'अमित शहा यांना आव्हान काय देता ? तुमच्यासाठी मुंबई भाजपचे कार्यकर्तेच काफी आहेत,' अशा शब्दात भातखळकर यांनी पलटवार केला आहे.

अतुल भाततखळकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या टोमण्या मेळाव्यात त्यांना भाजपच्या भ्रष्टाचाराची चिंता पडली आहे. अहो ठाकरे साहेब तुम्ही तर देशद्रोही आणि भ्रष्टाचारी नवाब मलिकला मंत्रिमंडळात ठेवला होतात. अमित शहा यांना आव्हान काय देता ? तुमच्यासाठी मुंबई भाजपचे कार्यकर्तेच काफी आहेत. मोदी -शहा देशाचे नेते आहेत, तुमच्यासारखे मागच्या दाराने आलेले नेते नाहीत. कोरोनाकाळात घरामध्ये कडी लावून बसला होतात, त्यावर बोला. अन्यथा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तुम्हाला मुंबईकर जनता मुंबईतून हद्दपार करेल, अशा शब्दात भाततखळकर यांनी टीका केली.

Atul Bhatkhalkar
रात्री उशीरा एकनाथ शिंदे - अमित शहांची गुप्त भेट? तर्क वितर्कांना उधाण

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अमित शहांचा उल्लेख मुंबईवर ठपून बसलेली गिधाडे असा केला होता. "मुंबई संकटात असते तेव्हा ही गिधाडे कुठे असतात. मुंबई जमीन नाही, ही आमची मातृभूमी आहे. जो आमच्या अंगावर येईल, त्याचा कोथळा बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही. आईला गिळायला निघालेली ही औलाद आहे. दसरा मेळावा येतोच आहे, तेव्हा बोलणार आहेच, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी कालच्या मेळाव्यातून दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com