फोन टॅपिंग प्रकरण : IPS रश्‍मी शुक्‍लांना क्लिन चीट मिळणार?

Rashmi Shukla : बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये शुक्‍ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 Rashmi Shukla Latest News
Rashmi Shukla Latest NewsSarkarnama

पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या नाना पटोले, बच्चु कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग केल्याच्या प्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये "क्‍लोजर रिपोर्ट' दाखल करण्यात आला आहे, त्यास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ठपका ठेवल्यानंतरच्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालानुसार शुक्‍ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाने फेब्रुवारी 2021 मध्ये दिल्यानंतर शुक्‍लाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. (Rashmi Shukla Latest News)

 Rashmi Shukla Latest News
राणेंच्या आरोपांनंतर ईडी, सीबीआय 'मातोश्री'चे दरवाजे ठोठावणार?

तत्कालीन महाविकास आघाडीची राज्यामध्ये सत्ता असताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची "अमजद खान', शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चु कडू "समशेर बहाद्दुर शेख' यांच्यासह माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांनाही विविध प्रकारची नावे देत त्यांचे फोन टॅपिंग केले, तसेच त्या फोनमधील संभाषण भाजप सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा राज्य गुप्त वार्ता विभागाच्या (स्टेट इंटिलिजन्स डिपार्टमेंट-एसआयडी) आयुक्त असताना शुक्‍ला यांनी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

याप्रकरणी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांची उच्चस्तरीय समितीला सांगण्यात आले होते. संबंधित समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावरुन बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये शुक्‍ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्‍ला यांच्या विरुद्ध भारतीय तार अधिनीयम कलम 26 नुसार बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण (फोन टॅपिंग) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता.

 Rashmi Shukla Latest News
मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी छोटा राजनला सुपारी दिली होती; राणेंचा गंभीर आरोप...

दरम्यान, राज्यात सत्ता पालटल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने संबंधित प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्षेषण विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांनी न्यायालयामध्ये "क्‍लोजर रिपोर्ट' सादर केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

 Rashmi Shukla Latest News
Smruddhi: ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्गावर वाहनांची गती घटली!

शुक्‍ला यांनी राजकीय नेत्यांचे फोन टॅप करुन ते भाजपला पुरविले असल्याच्या तसेच शुक्‍ला यांनी पुण्यातील कार्यकाळातही त्यांच्या पदाचा गैरवापर करून बेकायदा अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याचे अहवालात नमूद केले होते.त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून सरू होता. याप्रकरणात तत्कालीन तांत्रिक विश्‍लेषण विभागाचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. शुक्‍ला या पोलिस आयुक्‍त असताना त्यांच्या कालावधीतच हे प्रकरण घडल्याने, त्यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची देखील चौकशी करुन जबाब नोंदविण्यात आला होता.

शुक्‍ला सध्या हैद्राबाद येथे केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. त्याराज्य गुप्त वार्ता विभागात (स्टेट इंटिलिजन्स डिपार्टमेंट-एसआयडी) आयुक्त असताना फोन टॅपिंग प्रकरण घडले होते. त्यापुर्वी त्या पुणे पोलिस आयुक्त असतानाही याच पद्धतीने त्यांनी काम केल्याचा ठपकाही अहवालामध्ये ठेवण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com