राणेंच्या आरोपांनंतर ईडी, सीबीआय 'मातोश्री'चे दरवाजे ठोठावणार?

Narayan Rane : कोरोनात उद्योग-धंदे बंद असताना, शिवसेनेच्या मुखपत्रातून उत्पन्न दाखविले आहे.

Uddhav Thackeray, Narayan Rane Latest News
Uddhav Thackeray, Narayan Rane Latest Newssarkarnama

मुंबई : लोकांचे शोषण करून मिळालेला पैसा ठाकरे यांनी व्हाइट केला असून, त्याचे पुरावे दिल्लीत योग्य ठिकाणी दिले आहेत, असे सांगत ठाकरे यांची आता सुटका नाही, अशा शब्दांत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) इशारा दिला आहे.

यामुळे ठाकरे यांच्यामागे आता केंद्रीय तपासयंत्रणांचा ससेमिरा लागणार असल्याचे राणे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. यामुळे आता राणेंच्या आरोपानंतर ईडी, सीबीआय 'मातोश्री'चे दरवाजे ठोठावणार का?, असा सवाल अनेकांना पडला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Uddhav Thackeray, Narayan Rane Latest News)


Uddhav Thackeray, Narayan Rane Latest News
मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी छोटा राजनला सुपारी दिली होती; राणेंचा गंभीर आरोप...

बुधवारी 'शिवतीर्था'वर शिवसेनेच्या झालेल्या दसरा मेळाव्यावर राणेंनी सडकून टीका केली. या सभेत काय वक्ते होते. तुम्ही कीती खाली गेलात हे दाखवून द्यायची गरजच उरली नाही. बाळासाहेब शिवसैनिकांना साभाळून घ्यायचे. मात्र उद्धव ठाकरे हे कपटी माणूस असून लबाड लांडगा आहे. शिवसेना सोडल्यावर मला मारण्याची सुपारी त्यांनी छोटा शकील, छोटा राजन टोळीला दिली होती, असा गंभीर आरोपही राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

शिवसेनेच्या मेळाव्यात ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यावर आज पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे यांचे राजकारण, त्यांचे हिंदुत्व, मुख्यमंत्रीपद, त्यासाठीच्या तडजोडी सांगून राणे यांनी ठाकरेंचा एकेरी उल्लेख करीत, प्रत्युत्तर दिले. आदित्य, तेजस आणि ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरही राणेंनी निशाणा साधला.


Uddhav Thackeray, Narayan Rane Latest News
उद्धवजी, ‘ते’ शब्द परत घ्या : देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना आवाहन

राणे म्हणाले, कोरोनात उद्योग-धंदे बंद असताना, शिवसेनेच्या मुखपत्रातून उत्पन्न दाखविले आहे. ठाकरे यांचा काळा पैसा पांढरा करण्यात आला आहे. इतरांवर खोक्यांचा आरोप करणाऱ्या ठाकरे यांच्याकडील खोक्यांचे उत्पन्न दाखविले गेले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडे आलेल्या पैशांचीही चौकशी ठाकरे करतात. आमच्या घरापर्यंत येणाऱ्यांना मी स्वस्थ बसू देणार नाही.

"बाळासाहेबांचे भाऊ, मुले यांच्यासोबत नाहीत. तुम्ही तुमचे कुटुंब आणि तुमचे पाटणकर हाच परिवार आहे. ठाकरे घराण्यात त्यांचे विचार कोणासोबत जुळत नाहीत. शिवसेनेतील अनेक जुन्या नेत्यांवर हल्ले करण्यास ठाकरे यांनी सांगितले होते. आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेची चौकशी केली होती. कोणी जमीन दाखविण्याची गरज नाही. आपोआप जमिनीवरच आला आहात. पंतप्रधान गृहमंत्र्यांबाबत बोललात, त्यातील काही कळते का? हे मुख्यमंत्री असतांना यांना काही कळले नाही. तेव्हा, देशाचा काय संबंध नाही. खरी शिवसेना शिंदे यांचीच आहे, अशा शब्दात राणेंनी ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले.


Uddhav Thackeray, Narayan Rane Latest News
Rane vs Thackeray : दिशा सॅलियन खून प्रकरणात आदित्य ठाकरे.....राणेंचा गंभीर आरोप

भाजपच्या नेत्यांना बोललात तर महाराष्ट्रत सभा होऊ देणार नसल्याचे आव्हानही राणेंनी दिले. त्यांनी भाजपच्या नेत्यांवर बोलणार नाही, असे आधी प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यावे, मग सभा होऊ देऊ. असेही राणेंनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी संरक्षण काढले तर फिरणे अवघड होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. बंडखोरीनंतर ठाकरे हे येत्या ९ ऑक्टोबरपासून राज्यात 'महाप्रबोधन यात्रा' काढून सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीरवर राणे यांनी आपली भूमिका मांडली. आता राणेंच्या या टीकेवर आता शिवसेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे.

दरम्यान, राणे यांनी केलेल्या आरोप आणि इशाऱ्यावर ईडी आणि सीबीआयकडून त्यांची चौकशी करणार का?, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. कारण याआधी भाजप नेत्यांनी आणि त्यातही किरीट सोमय्या यांनी इशारा दिला की, लगेच केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडलेल्या बघितल्या गेल्या आहेत. यामुळे राणेंच्या इशाऱ्यानंतर आता 'मातोश्री'चा दरवाजा ठोठावला जाणार का? हे बघावं लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com