मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी छोटा राजनला सुपारी दिली होती; राणेंचा गंभीर आरोप...

Narayan Rane : बाळासाहेब यांच्यासारखे कपटी नव्हते त्यांनी आमची आई-वडिलांसारखी काळजी घेतली.
Narayan Rane, Uddhav Thackeray Latest News
Narayan Rane, Uddhav Thackeray Latest Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नेहमीप्रमाणे शिवसेना पक्षप्रुमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बुधवारी 'शिवतीर्था'वर शिवसेनेच्या झालेल्या दसरा मेळाव्यावर त्यांनी सडकून टीका केली.

या सभेत काय वक्ते होते. तुम्ही कीती खाली गेलात हे दाखवून द्यायची गरजच उरली नाही. बाळासाहेब शिवसैनिकांना साभाळून घ्यायचे. मात्र उद्धव ठाकरे हे कपटी माणूस असून लबाड लांडगा आहे. शिवसेना सोडल्यावर मला मारण्याची सुपारी छोटा शकील, छोटा राजन टोळीला उद्धव ठाकरेंनी दिली होती,असा गंभीर आरोपही राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Narayan Rane, Uddhav Thackeray Latest News)

Narayan Rane, Uddhav Thackeray Latest News
मुख्यमंत्री शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणावर नारायण राणेंची छाप!

राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे अपघाताने मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी इतक्या दिवस मराठी माणसासाठी काय केलं हे झालेल्या दसरा मेळाव्यात सांगायला हवं होत. मात्र सांगायला अस काहीच नाही. 'शिवतीर्था'वर विरळ माणस उभे केले होती. ठाकरे भाषणाला उभे राहिल्यावर माणस बाहेर जात होते. यावरून त्यांनी आपली काय पात्रता ते समजून घ्यावं.

आपण आतापर्यंत शेतकरी आणि उद्योगासाठी काय केलं हे मेळाव्यात सांगायला हवे होते. झालेला मेळावा हा तमाशाकारांचा तमाशा होता. त्यामध्ये काय वक्ते दिले. जेव्हा बाळासाहेब मेळावे घेत होते तेव्हा मातब्बर वक्ते होते. आताचे नावे पाहिल्यावर शिवसेना किती खाली आली हे मेळावा पाहिल्यावरच समजते सांगायची गरजच नाही, अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Narayan Rane, Uddhav Thackeray Latest News
उद्धवजी, ‘ते’ शब्द परत घ्या : देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना आवाहन

मेळाव्यात काहींना फक्त राणेंवर बोलण्यासाठीच आणले होते. मात्र आम्ही आमच्या नेत्यांबद्दल ऐकूण घेणार नाही. उद्या कायदा सुविधा बिघडला तर त्याला ठाकरे जबाबदार असतील. ठाकरेंना वाकायला पण डॅाक्टर लागतो मग काय तुम्ही काम करणार. ते २० मिनिटं सुद्धा चालू शकत नाहीत.

२०१९ निवडणुकीत नाव आणि फोटो लावून निवडणुक लढवली आणि आता मोदींवर टीका करत आहे. पाकिस्तानात पंतप्रधान जात गेले त्यावर टीका करत आहे. यांना काय माहित की काही संबध असताता देशाचे. हे तुम्हाला काही कळणार नाही. आपण मुख्यमंत्रीच अपघाताने झाले आहेत. यांचं बेगडी हिंदूत्व आहे. यांनी मला मारण्यासाठी छोटा शकील, छोटा राजन टोळीला सुपाऱ्या दिल्या मात्र काही उपयोग झाला नाही, असा गंभीर आरोपही त्यानी ठाकरेंवर केला.

Narayan Rane, Uddhav Thackeray Latest News
शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये वाद : नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले...

खासदार शेवाळेंनी परवा आपल्या भाषणात काय ते सांगितलंच आहे. याचबरोबर माझ कोकणातील घर जाळलं गेलं. उद्धव ठाकरे हे आयत्या बिळातील नागोबा आहेत. यांचं सेना वाढीत काय योगदान आहे. हे कधी 'मातोश्री' सोडून बाहेर पडलेत का? बाळासाहेबांच नाव घ्यायच नाही म्हणतात पण बाळासाहेब यांच्यासारखे कपटी नव्हते. त्यांनी आमची आई-वडिलांसारखी काळजी घेतली. उद्धव टाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीत गेले. ते लबाड लांडगा आहेत, अशा शब्दात राणेंनी ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा समाचार घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com