उद्धव आणि आदित्य यांचे फोटोही बंडखोरांना आता नकोसे..! म्हणे ते तर आमच्या...

Rahul Shewale यांच्यासह तीन बंडखोरांनी आपल्या कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचा फोटो हटविला आहे..
Uddhav-Aditya Thackeray
Uddhav-Aditya Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेतील (Shiv sena) बंडखोरांनी आता ठाकरे (Thackeray Family) कुटुंबापासून पूर्ण फारकत घेण्याचे ठरविलेले दिसत आहे. साधा शिवसैनिक असो की पदाधिकारी याच्या प्रत्येकाच्या कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांची छाचायित्रे दिसत होतीच. मात्र शिंदे गटाच्या खासदार आणि आमदार यांनी आता उद्धव आणि आदित्य या दोघांची छायाचित्रे आपल्या कार्यालयातून तसेच कार्यक्रम पत्रिकेतून हटवली आहेत.

त्याची सुरवात खासदार राहुल शेवाळे यांनी केली. त्यांनी आपल्या खुर्चीच्या पाठीमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे छायाचित्र लावले. तेथे आधी लावलेली उद्धव आणि आदित्य या दोघांचेही छायाचित्रे काढून टाकली. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनीही तोच कित्ता गिरवला. दुसरे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या दहीहंडिच्या पत्रिकेवरून ठाकरेंची छायाचित्रे यंदा घेतली नाहीत.

उद्धव आणि आदित्य हे सध्या रोज बंडखोरांवर तुटून पडत आहेत. त्यामुळे बंडखोरांनीही त्यांचे मार्गदर्शक म्हणून स्थान आता काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे शिवसेना शाखांत एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असावे म्हणून शिंदे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेत उद्धव यांच्यासोबत शिंदे यांचेही छायाचित्र लावण्यात शिंदे समर्थक यशस्वी झाले. एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत यांचेही छायाचित्र लावण्यासाठी या समर्थकांचा आग्रह होता. तो सध्या बाजूला पडला आहे.

Uddhav-Aditya Thackeray
काय शिकवलयं की नाय या पोराला? शहाजीबापूंची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका

या साऱ्या घटनांवर सरनाईक यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी चलाखपणे उत्तर दिले. ठाकरे कुटुंबीय हे आमच्या हृदयात आहे. त्यांचे फोटो तेथे आहेत, असे उत्तर दिले. बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शाखेत मुख्यमंत्र्यांचे फोटो लावणे चुकीचे नसल्याचे स्पष्ट केले. एकूणच आता ठाकरेंपैकी केवळ बाळासाहेब यांनाच आपण मानणार असल्याचा संदेश या बंडखोरांनी दिल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com