सिल्व्हर ओक हल्ला : PI अनुप डांगे यांची गावदेवी पोलीस ठाण्यात नियुक्ती

अनुप डांगे हे यापूर्वी याच स्थानकात कार्यरत होते. परमबीर सिंह यांच्याकडून त्यांचं निलंबन झालं होतं.
PI Anup Dange News, Silver Oak Attack case news updates
PI Anup Dange News, Silver Oak Attack case news updatessarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्या मुंबईमधील सिल्वर ओक या घरावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी दोन दिवसापूर्वी पोलीस उपायुक्त योगेश कुमार यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. तर काल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामप्यारे राजभर यांनाही हटविण्यात आले आहे. (Silver Oak Attack case news updates)

गावदेवी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकपदी आता अनुप डांगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गावदेवी पोलीस स्थानकाच्या अंतर्गतच सिल्व्हर ओक हे निवासस्थान येतं. अनुप डांगे हे यापूर्वी याच स्थानकात कार्यरत होते.

PI Anup Dange News, Silver Oak Attack case news updates
इंधन दरवाढीवरुन विमानातच स्मृती इराणींसोबत कॉंग्रेसच्या नेत्या भिडल्या ; व्हिडिओ व्हायरल

परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याकडून त्यांचं निलंबन देखील झालं होतं. अनुप डांगे हे यापूर्वी देखील चर्चेत आले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर त्यांनी आरोप केले होते. अनुप डांगे हे या प्रकरणाचा चांगल्या पद्धतीनं तपास करतील असा विश्वास गृहविभागाला असल्यानं ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अनूप डांगे यांच्या तक्रारीनंतर परमबीर सिंह यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होत आहे.

आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर चार दिवसापूर्वी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला.

PI Anup Dange News, Silver Oak Attack case news updates
तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लूटा ; राऊताचं नवं टि्वट

शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी एसटी संपकऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte)यांना अटक केली होती. याप्रकरणी सदावर्ते यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची पोलीस कोठडी आज संपत आहे.

परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab)यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अनिल परब म्हणाले, ''येत्या 22 तारखेंपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाचे आहेत. 22 तारखेपर्यंत जे कामगार रुजू होतील, त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. या आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना सेवेत घेता येणे शक्य नाही.

परब म्हणाले, ''22 तारखेपर्यंत कामगार कामावर आले नाही तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का याचा विचार ही केला जाणार आहे. पाच महिने बंद असलेल्या बस पूर्ववत करण्यासाठी बस आगाराने सर्व एसटी गाड्याची तपासणी केली आहे. एसटी महामंडळ बस सेवा सुरू करण्यासाठी पूर्ण पणे सज्ज आहे,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com