Mlas Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी मोठी अपडेट समोर; विधानसभा अध्यक्षांनी दिली माहिती

Shiv Sena Mlas Disqualification Case Hearing Assembly Speaker : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली मोठी माहिती...
Shivsena MLA Disqualification
Shivsena MLA Disqualification Sarkarnama
Published on
Updated on

Mla Disqualification Case Maharashtra : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी ही येत्या 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे.

Shivsena MLA Disqualification
Deepak Kesarkar : बाळासाहेब लोकशाही मानत नव्हते; उलट तपासणीत केसरकर काय काय म्हणाले ?

शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांच्या संमतीने वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. आता अंतिम सुनावणी सोमवारी 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 18 ते 20 डिसेंबर या तीन दिवसांत सुनावणी पूर्ण होणार आहे. ( Maharashtra Assembly Winter Session 2023 ) उद्यापासून पुढील तीन दिवसात लेखी उत्तर सादर करावं लागणार आहे. शनिवारी व रविवारी होणारी सुनावणी दोन्ही गटाच्या संमतीने रद्द करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचे कामकाज सुरू असतानाही सातत्याने सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे दरदिवशी सात तास सुनावणी घेण्यात येत आहे. आता साक्ष संपूर्ण पूर्ण झाली आहे. पुरावे सादर करण्याची मुभा संपली आहे. आता पुढील कारवाई करून 20 तारखेपर्यंत हे प्रकरण निर्णय घेण्यासाठी पूर्ण करायचे, असा प्रस्ताव मी दिलेला आहे. त्या अनुषंगाने सर्वांच्या सहकार्याने हे काम 20 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

Shivsena MLA Disqualification
Uddhav Thackeray : सरकारला पेन्शनसाठी 'टेन्शन' देण्याची गरज; कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरून ठाकरेंचा निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com