Pune Loksabha : गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर पाठींबा दिला. या पाठींब्यानंतर राज ठाकरे महायुतीसाठी जाहीर सभा घेतील हे देखील स्पष्ट झाले. मात्र लोकसभा निवडणुकीचे Loksabha Election दोन टप्पे झाल्यानंतरही त्यांची एकही सभा झाली नव्हती. मात्र, लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण यांच्यासाठी राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा झाली. कोकणात झालेल्या सभेनंतर आता राज ठाकरे पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलधीर मोहोळ यांच्यासाठी सभा घेणार आहेत.
पुण्यात राज ठाकरेंची Raj Thackeray 10 मेला जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. या सभेत राज ठाकरे कोणावर हल्ला करणार याची उत्सुकता मतदारांना असणार आहे. कोकणातल्या सभेत राज हे कोकणच्या विकासावर जास्तीत जास्त बोलले. त्यामुळे पुण्याच्या सभेत त्यांच्या निशाण्यावर कोण असणार याची उत्सुकता असणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनसेच्या MNS स्थापनेनंतर राज यांना नाशिक, मुंबई, पुणे शहरातून चांगला पाठींबा मिळाला होता. पुणे महापालिकेत विरोधीपक्ष म्हणून मनसेने काम देखील केले. मात्र, पुढे मनसेला मिळणार पाठींबा कमी झाला. तरी पुण्यात मनसेचे हक्काचे मतदार आहेत. ते या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतील, असे मनसे नेते सांगत आहेत.
वसंत मोरे हे मनसेकडून पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मनसेला रामराम केला. राज ठाकरे यांच्यावर आपले अजूनही प्रेम असल्याचे ते जाहीरपणे सांगत आहेत. पण त्यांनी पक्ष सोडल्यानंतर राज ठाकरे त्यांच्या बाबतीत कोणतेही वक्तव्य केले नव्हते. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे वंचितकडून निवडणूक लढणाऱ्या वसंत मोरेंवर काय बोलणार याची उत्सुकता असणार आहे.
वसंत मोरे हे वंचितकडून निवडणूक लढत आहेत. तर, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे लढत आहेत. हे दोघे उमेदवारांनी मनसेमध्ये काम केले आहे. मनसेकडून दोघेही नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून गेले होते. त्यामुळे राज यांना आपल्या जाहीर सभेत या मनसेच्या माजी नगरसेवकांच्या विरोधात राज यांनी तोफ धडाडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.