Eknath Shinde News : मराठा आरक्षण टिकेल, मोदींच्या समोरच एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Loksabha Election : पंतप्रधान मोदींनी जगात देशाचा लौकिक वाढविला. आपले जीवन देशसेवेला अर्पण केले. इंडिया आघाडी आता पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

संजय रानभरे

Loksabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर Maha Vikas Aghadi जोरदार निशाणा साधला. राज्यात मराठा आरक्षणावरून मराठवाड्यात महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असताना पंतप्रधान मोदींसमोर एकनाथ शिंदे म्हणाले, सरकारने दिलेले मराठा आरक्षण टिकेल आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्याच प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुद्धा सुरू असून सगेसोयरे कायद्या वरती देखील काम असल्याचे शिंदेंनी सांगितले.

Eknath Shinde News
Ajit Pawar Vs Rohit Pawar : रोहित पवारांचे लहानपण काढत अजितदादांचा पलटवार; म्हणाले...

मोदींची Narendra Modi गॅरंटी चालते, मात्र यावेळी लोकांनी देशात मोदींचे सरकार आणण्याची गॅरंटी घेतल्याचे शिंदे म्हणाले. पंतप्रधान मोदींनी जगात देशाचा लौकिक वाढविला. आपले जीवन देशसेवेला अर्पण केले. इंडिया आघाडी आता पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत.

Eknath Shinde म्हणाले, महाराष्ट्रात उन्हाचा पार चढतो आहे त्या प्रमाणे चार जूनला चारसौ पार होईल. महायुती विरोधकांची लंका जाळून खाक करेल आणि तुतारीची पिपाणी होईल. अजमल कसाबवर विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील शिंदेंनी समाचार घेतला.

मोदींनी काढली गोपीनाथ मुंडेंची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. गोपिनाथ मुंडे यांच्यासोबत मागील दहा वर्षात अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर हे आपल्या सोडून गेलेल्या सहकाऱ्यांच्या आठवणीत मोदी भावूक झाले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com