PM Mumbai Visit : नरेंद्र मोदींच्या सभेसाठीही आली गर्दी जमवायची वेळ? 'हा' आदेश काय सांगतो...

PM Mumbai Visit Narendra Modi wadhwan bunder Bhoomipujan : वाढवण बंदराच्या भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमासाठी वाडा तालुक्यातील प्रत्येक गावात एक बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
 Narendra Modi
Narendra Modi sarkarnama
Published on
Updated on

दिलीप पाटील

PM Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा म्हटले की लोकां स्वंयस्फूर्तीने कार्यक्रमाला उपस्थित राहत. नरेंद्र मोदींचे भाषण म्हणजे नागरिकांसाठी पर्वणीच पण नरेंद्र मोदींचे वलय कमी होते आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण 30 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासााठी पालघरमधील सिडको भवन येत आहेत.

या कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी दिसावी म्हणून प्रशासन, सरकारी कर्मचारी मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक,आरोग्य सेवक, कृषी कर्मचाऱ्यांनां प्रत्येक ग्रामपंचायतीतून 50 लोकांना कार्यक्रम स्थळी नेण्याचा आदेशच दिला आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीतून 50 लोकांना कार्यक्रम स्थळी नेणे आणि तेथून परत आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या नाष्टा जेवणाची व पाण्याची सोय करण्यात आली असून तसे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फर्मान सोडण्यात आले आहे.

 Narendra Modi
Yajnavalkya Jichkar : अनिल देशमुखांच्या मतदारसंघावर काँग्रेसचा डोळा; दिवंगत माजी मंत्र्यांच्या सुपुत्राने ठोकला शड्डू

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक बस

वाढवण बंदराच्या भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमासाठी वाडा तालुक्यातील प्रत्येक गावात एक बसची व्यवस्था करण्यात आली आहे.या सोहळ्यासाठी लाखोंचा जनसमुदाय असावा म्हणून सरकार व प्रशासन प्रयत्नशील आहेत.

वाडा बसस्थानकातून पहाटे 4.30 वाजता बसचालकाला नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी बस घेऊन जायचे आहे. तसेच ग्रामपंचायतीमधून नागरिकांना घेऊव पालघर सिडको भवन येथे सकाळी दहा वाजेपर्यंत पोहोचायचे आहे.

कर्मचाऱ्यांना करायचे 'हे' काम

वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कर्मचाऱ्यांनी बसमध्ये नागरिकांना पाणी देणे,निघण्यापूर्वी नाष्टा सोय करणे, सर्व नागरिक यांची हजेरी घेणे व मोबाईल नंबर घेणे, सर्व नागरिक यांना नेमून दिलेल्या ठिकाणी बसवणे व गाडी पार्किंगचे ठिकाण सर्वांना माहित करणे सर्व नागरिकांना येताना हजेरी घेऊन गाडीत बसवणे व गाडी नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचवणे आदी कामे कर्मचाऱ्यांना करायची आहे.

...तर कारवाई अटळ

वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार काम न करणे, गैरहजर, हलगर्जीपणा, टाळाटाळ केल्यास संबंधिताविरूध्द महाराष्ट्र नागरी व शिस्त अपील नियम 1979 नुसार कार्यवाही करण्याचा इशारा आदेशात दिला आहे.

काँग्रेसची टीका

काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले की, वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने जिल्ह्यातून नागरिकांच्या उपस्थितीतून शक्ती प्रदर्शन करू पाहत आहे. या कार्यक्रमासाठी करोडो रूपयांची चालू असलेली उधळपट्टी ही निरर्थक आहे.

वाढवण बंदरावर प्रत्यक्षात न जाता सिडको मैदानावरून हा उद्घाटन सोहळा करायचा असेल तर हा अनाठायी खर्च टाळून दिल्लीतून देखील ते ऑनलाईन उद्घाटन करू शकत होते. जनतेच्या पैशांच्या होत असलेल्या उधळपट्टीचा आम्ही निषेध करीत आहोत.

 Narendra Modi
Sassoon Hospital News : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे ससूनकडे दुर्लक्ष? आरोग्य यंत्रणा कोलमडली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com