Narendra Modi Sabha: मोदींचा जबरा 'कॉन्फिडन्स'; मतदान,निकालाआधीच महायुती सरकारच्या 'शपथविधी'चं दिलं निमंत्रण

PM Narendra Modi Mumbai Sabha : विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरुवारी (ता.14) मुंबईतील पहिलीच सभा शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेत त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी युती आणि आघाडीत अटीतटीची लढत होत आहे. याचदरम्यान,काही करुन महायुतीचंच सरकार पुन्हा राज्यात आणायचा चंग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी बांधला आहे. त्याचमुळे मोदी- शाह यांच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका सुरू आहे. पण पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) मुंबईतील पहिल्याच सभेत आपल्या कॉन्फिडन्सची झलक दाखवून दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरुवारी (ता.14)मुंबईतील पहिलीच सभा शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेत त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच महायुतीचं (Mahayuti) परत सत्तेत येणार असल्याचा दावा करत मतदान, निकालाआधीच मुंबईकरांसह महाराष्ट्रातील जनतेला थेट शपथविधीचंच निमंत्रण देऊन टाकलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले, अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं.पण मुंबईसाठी काहीच विकासकामं केली नाही.यामुळे मुंबई मागे गेली.मुंबई इमानदार आहे व मेहनती आहे. पुढे जाणारी आहे.पण काँग्रेसची वागणूक ही भ्रष्टाचारी व देशाला मागे टाकणे, विकासकामांत अडथळा आणणे ही आहे. त्यांनी अटलसेतू,मेट्रोला विरोध केला.युपीआय व टेक्नॉलॉजीची टिंगल उडवली, असंही ते म्हणाले.

Narendra Modi
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांचा पुन्हा एकदा भाजपला 'जोर का झटका'; दगाबाजी होऊनही विजय खेचून आणला

मुंबईत सर्व जातीचे,सर्व भाषांचे लोक येतात, एकत्र राहतात.पण मविआ जातीच्या नावावर भांडण लावत आहेत. काँग्रेस दलित, आदिवासींचा विरोध करतात.एसटी, एससी ओबीसींवाल्यांना तोडत आहेत. एकमेकांमध्ये भांडण लावत आहेत. पण काँग्रेस सरकार सत्तेत आलेतर एससी, एसटी ओबीसींचं आरक्षण काढून घेईल असा आरोपही मोदींनी यावेळी केला.

मुंबई बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताचे शहर आहे.पण आघाडीत एक असा पक्ष आहे,ज्याने बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट दिला आहे.एकदातरी राहुल गांधीच्या मुखातून बोलवून दाखवा की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. हे असं झाल ना, तुम्हांला खुप चांगली झोप येईल. तुम्हांला हॉस्पिटलमध्ये जायची गरज लागणार नाही.सावरकरांना शिव्या देणाऱ्या लोकांना पण ते मिठी मारतात असा टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला.

मुंबईचा जोश कधी थंड नाही पडत.आणि म्हणून 20 तारखेला रेकाँर्ड ब्रेकची जबाबदारी मी तुम्हांला देऊन जातो.हा जोश कायम टिकवून ठेवायचा आहे.महायुतीच्या सर्व उमेद्वारांना विजयी करायचं आहे आणि शपथग्रहणाची तयारी करायची आहे. माझ्या निवडणुकीच्या सभा कमी आहेत.पण जेव्हा सरकार येईल, त्यांच्या शपथविधीचं निमंत्रण द्यायला आज आलोय, असा आत्मविश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलून दाखवला.

Narendra Modi
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली, म्हणाले 'चालू काय करणार...'

मी झारखंडची निवडणूक पाहिली.महाराष्ट्राची पण बघत आहे.हरियाणात काँग्रेसचं काय झालं. लोकांनी करारा जवाब दिला.झारखंड व महाराष्ट्रात पण यापेक्षा जास्त करारा जवाब लोक देणार आहे. खोटं जास्त वेळ नाही टिकत.कोरे कागदाचं सविधान पण देशाला मला सांगायचं आहे.आझाद भारतानंतर बाबासाहेबांचं सविधान आपल्याला चालवत होतं.पण संपूर्ण भारतात ते लागू नव्हतं. हे काँग्रेसने लपवून ठेवलं.काश्मीरमध्ये सविधान नव्हतं.बाबासाहेबांचा अपमान यांनी केला.संविधान जम्मू कश्मीर मध्ये शिरु शकत नव्हतं.तुम्ही मला संधी दिली आणि कलम 370 आम्ही जमिनीत गाडून टाकलं असंही मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

जम्मू काश्मीरचे न्यायाधीश याआधी संविधानाची शपथ घेतली नव्हती, मुख्यमंत्र्यांनी घेतली नव्हती. पण आज जे सरकार बनलं आहे,आझादीनंतर कश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी संविधानाची शपथ घेऊन कामाला सुरुवात केली. ही कमाल तुमच्या मतदानाने केली. तुमच्या मतदानाची ताकद आहे. मला पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेवा करायची संधी द्या. म्हणून मला महायुतीची साथ हवी आहे. महाराष्ट्रात सरकार हवं आहे, कारण मी तुमच्यासाठी कोणताही अडथळा न येता काम करु शकेल.म्हणून मी इकडे तुमचा आशीर्वाद मागायला आलो आहे, अशी भावनिक सादही आपल्या भाषणात मोदींनी मुंबईकरांना घातली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com