Ganesh Naik : बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या भाजपच्या आमदाराला मोठा दिलासा

BJP MLA Ganesh Naik : लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असलेल्या एक महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
Ganesh Naik
Ganesh NaikSarkarnama

BJP MLA Ganesh Naik :बलात्काराचा गुन्हा दाखल झालेले भाजपचे आमदार गणेश नाईक यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर दाखल दोन्ही गुन्ह्यांमध्ये तथ्य़ आढळले आहेत, पण पोलिसांना पुरावे सापडत नाही, असा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. त्यानंतर तीन महिन्यात हे प्रकरण निकाला काढावे, असा आदेश उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाल दिला आहे. या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिस करीत आहे. (BJP MLA Ganesh Naik News update)

लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असलेल्या एक महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल आहे. संबधीत महिलेने याबाबत तक्रार दिली होती. गणेश नाईक यांच्याबरोबर १९९३ पासून लिव्ह इन रिलेशनमध्ये संबंध असून आपल्याला एक १५ वर्षांचा मुलगा देखील असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला आहे.

Ganesh Naik
Ashok Chavan : कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी शिंदे-फडणवीसांचे मानले आभार..

आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. आपल्या मुलाला नाईकांचे नाव मिळावे आणि संपत्तीत अधिकार मिळावा, अशी आपली मागणी असून या मागणीमुळे गणेश नाईक हे आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.गणेश नाईकांनी मार्च 2021 मध्ये आपल्यावर रिव्हॅालव्हर रोखले आणि ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रारही या महिलेने सीबीडी पोलिसांकडे केली आहे.

Ganesh Naik
Shinde Government : गद्दारांची पोरं हातावर 'मेरा बाप चोर' हे लिहितील : शिवसेनेच्या तिन्ही 'संजय' मध्ये जुंपली !

या दोन्ही प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने गणेश नाईकांना नोटीस बजावली आहे. परंतु त्यानंतर काहीच झाले नाही, असे नाईक यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयात सांगितले. यावेळी कनिष्ठ न्यायालय़ात दोन्ही प्रकरणे लवकराच लवकर निकाली काढण्याची विनंती केली, ही विनंती मान्य करत न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाला दोन्ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. नाईक यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com