Chhagan Bhujbal : भुजबळ हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीतील ओवैसी ; बावनकुळेंचा हल्लाबोल

Chhagan Bhujbal : भुजबळ यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात हे विधान केले आहे.
chandrashekhar bawankule, Chhagan Bhujbal
chandrashekhar bawankule, Chhagan BhujbalSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी सर्व शाळांमध्ये सरस्वती मातेच्या फोटो ऐवजी महापुरुषांचे फोटो असावेत असं विधान केलं होतं. यावरुन राजकारण पेटले आहे. भाजप आणि संस्थांनी भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी भुजबळांवर सोमवारी निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

छगन भुजबळ हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी मधले ओवैसी आहेत असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. बावनकुळे म्हणाले, "छगन भुजबळ यांनी सरस्वती मातेच्या संदर्भामध्ये जे विधान केले आहे. त्यावरुन छगन भुजबळ हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी मधले ओवैसी आहेत,"

छगन भुजबळ यांनी “सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असं विधान नुकतेच केले आहे. यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे.

काही संघटनांनी त्यांचा निषेध केला आहे. भुजबळ यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात हे विधान केले आहे. छगन भुजबळ आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. भुजबळ यांनी काही दिवसापूर्वी केलेल्या या विधानावर ठाम असल्याचे दिसले.

chandrashekhar bawankule, Chhagan Bhujbal
BJP : अजितदादांनी, सत्तेमध्ये येण्याचं स्वप्न बघू नये ; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोमणा

छगन भुजबळ म्हणाले, "मी एका संस्थेच्या सभासदांसमोर बोलत होतो. मला मत मांडण्याचा अधिकार आहे. सावित्री फुले, महात्मा फुले यांच्यामुळे आपल्याला शिक्षण मिळाले," भुजबळ यांच्या विधानावरुन राज्यात भाजपाने आक्रमक होत ठिकठिकाणी त्यांचा निषेध केला आहे. माफीची मागणी केली. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. “”कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

नेमकं भुजबळ काय म्हणाले होते..

पुण्यातील आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी हिंदू देवींच्या फोटोंचा उल्लेख केला. "शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला," "सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?” असं विधान भुजबळ यांनी केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com