Pooja Chavan Death Case : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी न्यायालयात जनहित याचिका, संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार?

Sanjay Rathod Facing Difficulties in Pooja Chavan Case : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
Pooja Chavan| Sanjay Rathod
Pooja Chavan| Sanjay RathodSarkarnama
Published on
Updated on

Pooja Chavan Death Case Update: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशीची मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

तर या प्रकरणाशी संबंधित फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट आणि सिडीआर रिपोर्ट उघड करा अशी मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर संजय राठोड यांच्या अडचणी वाढू शकतात.

नेमकं प्रकरण काय?

पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील (Pune) वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील रुमच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये तत्कालीन मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले होते. हे प्रकरण भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलंच उचलून धरलं होतं.

Pooja Chavan| Sanjay Rathod
PM Narendra Modi : "समाजात फूट पाडणाऱ्यांना..."; सरन्यायाधीशांच्या घरातील गणपती पूजेच्या वादावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, संजय राठोड (Sanjay Rathod) हे महायुतीत सामील झाल्यानंतर भाजपच्या आणि चित्रा वाघ यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून या प्रकरणाची काहीच चर्चा नव्हती मात्र आता ऐन विधानसभेच्या तोंडावर ही सीबीआय चौकशी करणारी जनहित याचिका दाखल केल्यामुळे राठोड यांच्या अडचणी वाढू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com