CM Shinde : एकनाथ शिंदेंच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय! प्रचार रॅली सोडून हात भाजलेल्या रूंद्राशच्या मदतीला धावले

Thane Loksabha Constituency : ठाणे लोकसभा मतदारसंघात नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलीदरम्यान घडली घटना
CM Shidne
CM ShidneSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली रविवारी किसन नगर परिसरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी या रॅलीला सुरुवात झाली असतानाच घडलेल्या एका घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा एक आगळा वेगळा अनुभव ठाणेकरांना पहायला मिळाला.

शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली किसन नगर परिसरात पोहोचली,मात्र रॅली सुरू असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांनी एक आई आपल्या जखमी मुलाचा हात हातात घेऊन रस्त्याने चाललेली दिसली. या आईच्या खांद्यावर एक मूल तर हातात दुसरे मूल होते. हातात असलेल्या मुलाचा हात गंभीररित्या भाजलेला असल्याने ती त्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. अशात मुख्यमंत्र्यांनी तिला पाहिले आणि त्या माऊलीची अडचण जाणून घेत ते रॅली सोडून तिच्या मदतीला धावून गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Shidne
Sandipan Bhumere News : उमेदवारी लेट पण प्रचार थेट! भुमरेंच्या प्रचारासाठी महायुतीचे नेते लागले कामाला

त्यांनी तत्काळ त्या मुलाला आपल्यासोबत घेतले आणि त्याला जवळच्या मानवता हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी डॉक्टराना त्यांच्या भाजलेल्या हातावर तत्काळ उपचार करायला सांगितले.

रुद्रांश रोनीत चौधरी असे या नऊ वर्षाच्या मुलाचे नाव होते. घरात खेळत असताना अचानक हातावर तेल सांडल्याने त्याचा हात गंभीररीत्या भाजला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याला रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू झाले. तो सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्यमंत्री पुन्हा एकदा प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे त्यांची संवेदनशील मुख्यमंत्री ही ओळख ठाणेकर नागरिकांसमोर पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

CM Shidne
Loksabha Election 2024 : 'कमळाची मतं धनुष्यबाणाला', शंभूराज देसाईंनी केली खुंटी बळकट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com