NCP's CM : ‘उद्धव ठाकरेंनंतर पुढची अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता; पण ते अजितदादा नव्हते, तर...’

Umesh Patil Secret Explosion : एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाला महाविकास आघाडीत असताना अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी विरोध केला होता, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले.
Sharad Pawar-Uddhav Thackeray-Sanjay Raut-Ajit Pawar
Sharad Pawar-Uddhav Thackeray-Sanjay Raut-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 19 may : महाविकास आघाडीच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता. मात्र, तो अजितदादांऐवजी दुसरा व्यक्ती होता. ती दुसरी व्यक्ती, याबाबत गोपनीयता ठेवण्यात आली होती. ते नाव फक्त आमचे त्यावेळचे वरीष्ठ नेते, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच माहीत होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्रिपदाला महाविकास आघाडीत असताना अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी विरोध केला होता, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी सडेतोड उत्तर दिले. खुद्द संजय राऊत (Sanjay Raut) यांचाच एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्याला विरोध होता. मात्र, ते अजित पवार (Ajit Pawar), वळसे पाटील आणि तटकरेंचे नाव घेत धांदात खोटे बोलत आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Uddhav Thackeray-Sanjay Raut-Ajit Pawar
Tawde Meet Raj Thackeray : मुंबईत मतदानाला अवघे काही तास उरले असताना तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

उमेश पाटील म्हणाले, शरद पवार यांनी तीनही पक्षाच्या बैठकीत हात वर करून उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केले होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, असे पवारांनी जाहीरपणे सांगितले होते. मात्र, राष्ट्रवादीतील अजितदादा, वळसे पाटील, तटकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाला विरोध केला होता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नाईलाजाने मुख्यमंत्री व्हावे लागले होते, असे चुकीचे संजय राऊत सांगत आहेत.

संजय राऊतांच्या आरोपाला उत्तर देताना उमेश पाटील म्हणाले, राजकारणात सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सांगितल्या जात नाहीत. पण, आमचे वरिष्ठ नेते आणि संजय राऊत यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी सुरुवातीच्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरे, तर त्यानंतरच्या अडीच वर्षांनंतर एक वेगळे नाव ठरले होते. त्या नावाबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती. त्याबाबतही अजित पवार, वळसे पाटील, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना माहिती देण्यात आली नव्हती, असा दावाही पाटील यांनी केला.

Sharad Pawar-Uddhav Thackeray-Sanjay Raut-Ajit Pawar
Pandharpur-Mangalvedha : पंढरपूर-मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची स्पेस कोण भरून काढणार?

अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता. पण, अजित पवार यांच्या व्यतिरिक्त आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या डोक्यात जे नाव होतं. ते नाव फक्त संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनाच माहिती होते. हे संजय राऊत यांना सर्वकाही माहिती आहे. हवं तर त्यांनी याबाबत पुन्हा एकदा खुलासा करावा, असे आवाहनही उमेश पाटील यांनी केले.

Sharad Pawar-Uddhav Thackeray-Sanjay Raut-Ajit Pawar
Sharad Pawar Vs Anna Hazare : अण्णा हजारे आता आहेत कुठे? शरद पवार, असे का म्हणाले...?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com