प्रकाश लिमये
Mira-Bhayandar News : मीरा-भाईंदर शहरात बांधण्यात आलेली विविध समाज भवने, आरक्षणात करण्यात आलेले बदल यावरून भाजपने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना महापालिकेच्या महासभेत टार्गेट करण्यात आले. या सर्व कामांची चौकशी करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या महाभेत घेण्यात आला.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रताप सरनाईक व भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद उफाळून आलेला दिसला. त्यांचे पडसाद महापालिकेच्या पहिल्याच महासभेत दिसून आले.
प्रताप सरनाईक यांनी शहरात विविध समाजांसाठी समाजभवने बांधण्याचे जाहीर केले आहे. त्यातील काही कामे पूर्ण झाली आहेत तर काहींची कामे सुरू आहेत. याशिवाय सरनाईक यांच्या पाठ्यपुराव्यामुळे राज्य सरकारच्या मूलभूत सोई सुविधा निधीतून शहरात अनेक ठिकाणी विविध विकास कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यासाठी आरक्षणांमध्ये बदलही करण्यात आले आहेत. यावरून भाजपने महासभेत सरनाईक यांचे नाव न घेता त्यांना जोरदार लक्ष्य केले.
शहरात बांधण्यात येत असलेल्या विविध समाज भावनांचा वापर नेमका कोणासाठी होणार आहे. त्या समाज भवनात विशिष्ट समाजाचेच लोक जाऊ शकणार आहेत की ती सर्वांसाठी खुली असणार आहेत यांचा खुलासा प्रशासनाने करावा अशी आक्रमक भूमिका भाजपचे गटनेते हसमुख गेहलोत, नगरसेवक दिनेश जैन, अनिल भोसले यांनी घेतली. त्यावर शहर अभियंता दीपक खांबीत यांनी ही समाज भावाने कोणत्याही विशिष्ट समाजासाठी नसून ती सर्वांसाठी खुली असणार आहेत असे स्पष्टीकरण केले.
या समाजभवनांबाबत काही जणांकडून लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे त्यामुळे प्रशासनाने ही समजाभवने सर्वांसाठी असल्याचा जाहीर खुलासा प्रसिद्ध करावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.
याव्यतिरिक्त शहरात विविध आरक्षणात बांधण्यात येत असलेले तरण तलाव, ट्राफिक पार्क अशी विविध विकास कामे आरक्षणात बेकायदा बदल करून त्याचप्रमाणे या बदलांना राज्य सरकारची मान्यता मिळाली नसताना करण्यात आली आहेत असा आरोप भाजपकडून महासभेत करण्यात आला.
बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या खर्चात झालेल्या वाढीवरही भाजप नगरसेवकांकडून बोट ठेवण्यात आले. या सर्व प्रकरणांत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याने या सर्वांची चौकशी करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात यावी. या समितीत उपमहापौर, आयुक्त, स्थायी समिती सभापती, गटनेते यांचा समावेश करण्यात यावा असा निर्णय महासभेत घेण्यात आला.
राज्यातील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मीरा भाईंदरमधील विविध विकसकांसाठी ३००० कोटी रुपये आपण आणले आहेत. सरकारचे सर्व नियम, ध्येय धोरणे यांच्या चौकटीत राहून व पारदर्शकता पाळूनच सर्व विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे चौकशीतून काहीच हाती लागणार नाही. मात्र आपण केलेल्या विकास कामांच्या दहशतीचा सामना मात्र भाजपला नेहमीच करावा लागेल, असा टोला या चौकशी मंत्री प्रताप सरनाईक यांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.