मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचा दादरमधील शिवाजी पार्क येथे मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीत जायचं की नाही? याबाबतचा निर्णय ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे. पण, राज ठाकरे जे काही बोलतील, ते दिल्लीश्वरांपुढे झुकणारे नसेल, अशी मराठी माणसांची अपेक्षा आहे, असं मत विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार ( vijay wadettiwar ) यांनी व्यक्त केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
वडेट्टीवार म्हणाले, "राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे वाघ आहेत. पण, त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाहीत, असं सांगत होते. पण, त्यांना दिल्लीची वारी करावी लागली. यात कुठेतरी राज ठाकरे यांना अडचणीत आणि त्यांना पिंजऱ्यात अडवकविण्याचे काम होते का? अशी शंका महाराष्ट्रातील जनतेला आहे."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"राज ठाकरेंची भूमिका सत्ताधाऱ्यांबाबत नसेल, असा कयास आहे. ते दिल्लीपुढे झुकणार नाहीत, अशी मराठी माणसांची अपेक्षा आहे. त्यामुळे गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे जे काही बोलतील, ते दिल्लीश्वरांपुढे झुकणारे नसेल," असं वडेट्टीवार यांनी म्हटलं.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला उद्देशून एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरून वडेट्टीवारांनी संताप व्यक्त केला आहे. "मुनगंटीवार सांस्कृतिक की असांस्कृतिक मंत्री आहेत, हे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झालं. सामाजिक संस्कृतीला काळीमा फासणारे वक्तव्य त्यांनी केलं आहे. कोणत्याही महाराष्ट्रातील जनतेला ते विधान आवडणारं नाही. अशा प्रवृत्तीला जनता योग्य धडा शिकवेल," अशी टीका वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांवर केली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.