Latur Lok Sabha Constituency : काँग्रेस भवनात विजयाच्या संकल्पाची गुढी उभारत अमित देशमुखांची चाय पे चर्चा...

Amit Deshmukh News : देशमुखांनी ठरवलेला उमेदवार दिल्लीतील नेत्यांनी दिल्यामुळे डाॅ. शिवाजी काळगे यांना निवडून आणण्याची जबाबदारीही देशमुख बंधूंवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे लातूरचा ढासळलेला बालेकिल्ला मजबूत करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचे मोठे आव्हान देशमुख बंधूसह जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांसमोर असणार आहे.
Amit Deshmukh
Amit Deshmukh Sarkarnama

Latur, 09 April : महाविकास आघाडीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डाॅ. शिवाजी काळगे यांच्या प्रचाराची धुरा माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या खांद्यावर आहे. काळगे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून अमित देशमुख, धीरज देशमुख दोघांनीही प्रचारासाठी जिल्हाभरात दौरे सुरू केले आहेत. आज गुढीपाडव्याचा सण असला तरी प्रचारात खंड पडू न देता अमित देशमुख बाहेर पडल्याचे दिसून आले.

बैठका, मेळावे, भेटीगाठी असा भरगच्च कार्यक्रम रोज सुरू असल्याने साहजिकच थकवा येतो. अशावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत गप्पा-गोष्टी करत अमित देशमुख यांनी थोडा ब्रेक घेत एका हाॅटेलात चहाचा आस्वाद घेतला. लातूर येथील काँग्रेस भवनात अमित देशमुख यांच्या हस्ते विजयाच्या संकल्पाची गुढी उभारण्यात आली. त्यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह नजीकच्या हॉटेलमध्ये अमित देशमुख यांनी चहाचा आस्वाद घेतला. या वेळी राजकीय गप्पा रंगल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Deshmukh
Sangli Lok Sabha 2024 : सांगली ठाकरेंच्या शिवसेनेकडेच; काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तातडीने बोलावली बैठक

लातूर लोकसभेची निवडणूक काँग्रेस (Congress) गांभीर्याने लढवत नाही, अमित व धीरज देशमुख हे सोयीचे राजकारण करतात, असे आरोप गेल्या काही वर्षांपासून होतात. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील चित्र संपूर्णपणे बदलले आहे. देशमुखांनी ठरवलेला उमेदवार दिल्लीतील नेत्यांनी दिल्यामुळे डाॅ. शिवाजी काळगे यांना निवडून आणण्याची जबाबदारीही देशमुख बंधूंवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे लातूरचा ढासळलेला बालेकिल्ला मजबूत करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचे मोठे आव्हान देशमुख बंधूसह जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांसमोर असणार आहे.

एकीकडे महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) काळगे यांच्या रूपाने नवा, उच्चशिक्षित चेहरा उमेदवार म्हणून दिला आहे. तर दुसरीकडे भाजपने सुधाकर शृंगारे यांच्याबद्दल जिल्ह्यात नाराजीचा सूर असताना दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिली आहे. अर्थात, देशमुख बंधूंप्रमाणेच श्रृंगारे यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपच्या वरिष्ठांनी माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, रमेशअप्पा कराड व इतर नेत्यांवर सोपवली आहे.

Amit Deshmukh
Baramati Lok Sabha 2024 : धमकावलं असेल तर पोलिसांत तक्रार करा; अजितदादांचे पवारांना प्रत्युत्तर

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा थेट होणाऱ्या सामन्याआधी प्रचारात मात्र महाविकास आघाडीने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. भाजपच्या प्रचाराला अजूनही म्हणावा तसा वेग आलेला नाही. दुसरीकडे अमित, धीरज देशमुख यांनी संपूर्ण जिल्ह्यात मेळावे, बैठका आणि डोअर टू डोअर प्रचाराचे नियोजन केले आहे. अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी लातूर लोकसभा निवडणुकीची सगळी सूत्रं आपल्या हाती घेतली असून, काळगेंना विजयी करत भाजपला धक्का देण्याची तयारी चालवली आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Amit Deshmukh
Shahajibapu Advice Mohite Patil : शहाजीबापूंचा मोहिते पाटलांना अनाहुत सल्ला; ‘बारामतीकरांनी वाटुळं केलंय, त्यांच्याकडे जाऊ नका’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com