Uddhav Thackeray News : निवडणुकांच्या तयारीला लागा... उद्धव ठाकरेंनी फुंकले रणशिंग

त्यांना माहिती नाही त्यांनी मधमाशांच्या पोळावर दगड मारला आहे.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama

Uddhav Thackeray News : निवडणुक आयोगाने आपला पवित्र धनुष्यबाण चोरांना दिला, राज्यात कपट, कारस्थानाचं राजकारण सुरु आहे. पण आता निवडणुकीच्या तयारीला लागा, या निवडणुकीत चोरांचा आणि चोरबाजारांचा नायनाट केल्याशिवाय शांत बसायचं नाही, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना केलं आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी ओपन जीपमधून मातोश्रीबाहेर आज शिवसैनिकांशी संवाद साधला. ''ज्या पद्धतीने त्यांनी आपले शिवसेना नाव, धनुष्यबाण चोरांना दिला गेला, ज्या पद्धतीने हे कपट कारस्थाने करत आहेत. ते पाहता कदाचित ते आपली मशाल ही निशाणी सुद्धा काढू शकतील. अशी शंका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

Uddhav Thackeray News
Shivsena News : निवडणूक आयोगाने गंभीर चूक केली; कायदेतज्ज्ञांचे महत्त्वाचे विधान

''पण ज्यांनी धनुष्यबाण चोरले ते जर मर्द असतील. त्यांना माझं आव्हान आहे, त्यांनी चोरलेलं धनुष्यबाण घेऊन या मी माझी मशाल आणतो, धनुष्यबाण तुम्हाला पेलवणार नाही, धनुष्यबाण पेलायला सुद्धा मर्द लागतो. आता लढाई सुरु झाली आहे. मी खचलो नाही, खचणार नाही, तुमच्या ताकदीवर उभा आहे. अशा चोरांना गाडून त्यांच्या छाताडावर भगवा फडवण्याची ताकद आहे. निवडणुकांच्या तयारीला लागा. आता आपली परीक्षा आहे, लढाई आता सुरु झाली आहे. आतापर्यंत मी तुमच्या सोबत होतो पण आता तुमच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात या चोरांचा नायनाट करायचा,'' असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

यावेळी त्यांनी निवडणूक आयोग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, आज महाशिवरात्र आहे आणि उद्या शिवजयंती आहे. हा मुहूर्त बघुनच कदाचित हे त्यांनी हा निर्णय़ घेतला आहे. पण त्यांना माहिती नाही त्यांनी मधमाशांच्या पोळावर दगड मारला आहे. त्यांनी मधमाशांच्या मधाचा स्वाद घेतला आहे. पण आतापर्यंत त्यांनी मधमाशांचा डंख मारायची वेळ आली आहे.

भाजपला, पंतप्रधानांना असं वाटत असेल की त्यांच्या गुलाम बनलेल्या सरकारी यंत्रणा आमच्या अंगावर सोडून शिवसेना संपवू. त्यांना इतर पक्ष संपवता येतील पण शिवसेना संपवता येणार नाही. माजजं निवडणूक आयुक्तांना आव्हान आहे की तुमच्या मालकाच्या आदेशाने तुम्ही निर्णय़ दिला, पण शिवसेना आता कोणाची हे महाराष्ट्राच्या मालकाने , जनतेने ठरवायची वेळ आली आहे. यांचा जो डाव चाललाय यांना ठाकरे पाहिजेत बाळासाहेबांचे नाव पाहिजे, पण शिवसेनेचं कुटूंब नकोय.

मोदींच्या नावाने मते मागितली असा आपल्यावर आरोप झाला पण तेव्हा युती होती. एक वेळी जेव्हा जनता मोदींचे मुखवटे घालत होती. आता मोदींनाच बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतयं. ही आपल्या शिवसेनेची मदत घ्यावी लागत आहे. आज महाराष्ट्रात मोदींच्या नावाने मतं मिळत नाहीत म्हणून मोदींनाही बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतयं. हा आपला विजय आहे. महाराष्ट्राच्या जनतेला मुखवटा आणि खरा चेहरा माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com