Ratnagiri News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली होती.या दुर्घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती.
तसेच राजकीय वातावरणही तापलं होतं. मात्र,एकीकडून शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच पुन्हा एकदा रत्नागिरी चर्चेत आली आहे. उद्घाटनाच्या आधीच रत्नागिरी स्टेशनचे छत कोसळल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी रत्नागिरीच्या स्टेशनचे छत उद्घाटनाच्या आधीच कोसळल्याचा आरोप केला आहे. याचवेळी त्यांनी महाराष्ट्रात खोके आणि धोके सरकार असून त्यांनी अगणित भ्रष्टाचार केल्याचा हल्लाबोलही केला आहे.
प्रियंका गांधी म्हणाल्या, महायुतीच्या सरकारने जनतेची फसवणूक केली असून जनता त्यांचा लवकरच हिशोब करणार आहे. महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक सुरू असून कामात भ्रष्टाचार केल्याचा दावा केला आहे.यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.
मुंबई-नाशिक महामार्ग सुरू व्हायच्या आधीच त्यावर शेकडो खड्डे पडले, सिंधुदुर्गमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्येही राज्य सरकारने भ्रष्टाचार आहे. तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्च केलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्यालाही तडे गेल्याची टीका काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील रत्नागिरी स्टेशनचे छत उद्घाटनापूर्वीच कोसळले. मुंबई-नाशिक महामार्ग,जो अद्याप पूर्ण तयारही झाला नव्हता,त्यावर 500 पेक्षा जास्त खड्डे आणि भेगा पडल्याचं दिसून आलं आहे. यापूर्वी सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही उद्घाटनानंतर काही महिन्यांतच कोसळला होता.
आता मुंबईत 18 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला तडे गेले आहेत, असा घणाघात काँग्रेसच्या (Congress) महिला नेत्या प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावरुन केला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत.अशातच आता काँग्रेसच्या राहुल गांधींनी महाराष्ट्रावर फोकस करत आपले दौरे वाढवले आहे.त्याचवेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही देखील आगामी निवडणुकीत लक्ष घातले असून महायुती सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली आहे.
मालवणमध्ये केवळ 8 महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवलेला पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पुतळा कोसळल्यानंतर पुतळ्याच्या कामाविषयी राजकीय नेत्यांकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे. यातच आता प्रियंका गांधींनी रत्नागिरी स्टेशनचे छत उद्घाटनाआधीच कोसळल्याची दुर्घटना उघडकीस आणली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.