Congress News: 50 पदाधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण द्या; मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे काँग्रेसची मागणी

Political News: 50 पदाधिकाऱ्यांना संरक्षण द्या, अशी मागणी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Thane : आपल्या 50 पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी ठाण्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नगरसेवकाच्या पीएलाही पोलीस संरक्षण दिलं जातं. त्यामुळे आमच्या पक्षातील देखील 50 पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

"आमचे पदाधिकारी देखील आंदोलने करीत आहेत. विरोधाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांनाही पोलीस संरक्षण देण्यात यावे", असं त्यांनी सांगितलं आहे. आज ठाण्यात त्यांनी पत्रकार परिषदेत घेत ही मागणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर प्रवक्ते सचिन शिंदे, राहुल पिंगळे उपस्थित होते.

Congress News
Vivek Kolhe News : 'गणेश'च्या निवडणुकीत किंगमेकर ठरले विवेक कोल्हे; थोरातांच्या मदतीने विखे पाटलांचा गड केला खालसा!

"गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या संरक्षणाच्या विषयात आता काँग्रेसने देखील उडी घेतली आहे. मुंबईच्या हद्दीत जातांना टोल माफ करण्यासाठी याआधी मुख्यमंत्र्यांनीही आंदोलन केलं होतं. मात्र, अद्यापही टोलमाफी झालेली नाही. त्यामुळे किमान ठाणेकांसाठी तरी ही टोलमाफी मिळावी", अशी मागणी देखील यावेळी चव्हाण यांनी केली.

दुसरीकडे शहरातील स्मशानभूमीत अद्याप देखील मोफत लाकडे उपलब्ध होत नाहीत. इतर महापालिकांनी मोफत लाकडांबाबत निर्णय घेतला. पण पालिकेच्या तिजोरीवर बोजा पडेल म्हणून ठाणे महापालिकेने यावर काहीच निर्णय घेतला नाही.

वास्तविक पाहता या संदर्भातील ठराव मंजूर आहे. पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. याबरोबरच शहरात प्रत्येक प्रभाग समितीत शौचालयांची संख्या वाढवावी, त्यानुसार शहरात किमान आणखी 1 हजार नवीन शौचालये उभारण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Congress News
Sambhaji Patil Nilangekar News : लातूर जिल्हा जलयुक्त अन् ज्ञानयुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही..

'500 चौरस फुटांच्या घरांच्या करमाफीची हिम्मत दाखवावी'

दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रातील 500 चौरस फुटांच्या घरांना सत्तेत आल्यास करमाफी देण्यासागे आश्वासन शिवसेनेने दिलं होतं. त्यातील केवळ सामान्य कर माफ करण्यात आला. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असल्याने त्यांनी सरसकट 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी करण्याची हिम्मत दाखवावी, असं आव्हान ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिलं आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com