MLA Fund Distribution : २५-२५ कोटी काय घेऊन बसलाय; अजितदादांनी शंभर कोटी वाटले !

Ajit Pawar And MLA Fund Distribution : भाजपसह शिंदे आणि शरद पवार गटातील आमदारांवरही निधीचा वर्षाव
Prashant Bamb, Jayant Patil, Bharat Gogawale, Ajit Pawar
Prashant Bamb, Jayant Patil, Bharat Gogawale, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Monsoon Session MLA Fund : अर्थमंत्री अजित पवार निधीवाटपात दुजाभाव करतात असा आरोप करणाऱ्या आमदारांवर या पावसाळी अधिवेशनात निधीचा वर्षावर करून तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. पवार यांनी तब्बल दहा आमदारांना शंभर कोटीहून अधिक निधी वाटप केले असून यात भाजपसह शिंदे, शरद पवार आणि त्यांच्या आमदारांचाही समावेश आहे. (Latest Political News)

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना तब्बल ७४२ कोटी, पवार गटाचे जयंत पाटील यांना ५८०, दत्तात्रेय भरणे यांना ४३६ तर शिंदे गटाचे भरत गोगावलेंना १३४ आणि ठाकरे गटाचे उदयसिंह रजपूर यांना १२४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. दरम्यान, या निधीच्या वर्षावात मात्र काँग्रेसचे आमदार कोरडेच राहिल्याचे दिसून येत आहे. परिणामी पूर्वी शिंदे गटविरुद्ध अजित पवार असा होणारा वाद आता काँग्रेसविरुद्ध अजित पवार असा होण्याची शक्यता आहे.

Prashant Bamb, Jayant Patil, Bharat Gogawale, Ajit Pawar
Threats To Court judge : अबब! थेट हायकोर्टाच्या सहा न्यायाधीशांना उडवण्याची धमकी; 'खंडणी दिली नाही तर...'

बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटाने एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यामुळे या निधीवाटपात शरद पवार गटाला किती निधी मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. निधीवाटप करून मात्र अजितदादांनी सर्वांनाच धक्का देत पवार गटातील जयंत पाटील, रोहित पवार, राजेश टोपे यांना शंभरहून अधिक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अजित पवार यांनी आपल्या चार आमदारांना शंभरहून अधिक कोटींचा निधी दिला आहे. आपल्याकडे आलेल्या सर्व आमदारांना या निधीवाटपातून अजित पवार यांनी निश्चिंत केल्याचेही दिसून येत आहे.

Prashant Bamb, Jayant Patil, Bharat Gogawale, Ajit Pawar
Anna Hazare On Manipur Issue: आशेचे दिवे पुन्हा पेटले, पुन्हा मशाल पेटवा ! ; अण्णा हजारेंना ठाकरे गटाचे साकडे

कोणत्या आमदाराला किती मिळाला निधी?

प्रशांत बब (गंगापूर) : ७४२ कोटी- (भाजप)

जयंत पाटील (इस्लामपूर वाळवा) : ५८० कोटी - (राष्ट्रवादी - शरद पवार गट)

दत्ता भरणे (इंदापूर) : ४३६ कोटी - (राष्ट्रवादी - अजित पवार गट)

राजेश टोपे (घनसावंगी) : २९३ कोटी (राष्ट्रवादी - शरद पवार गट)

मकरंद अबा पाटील (वाई) : २९१ कोटी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)

रोहित पवार (कर्जत जामखेड) : २१० कोटी (राष्ट्रवादी - शरद पवार गट)

भरत गोगावले (महाड) : १३४ कोटी (शिवसेना - शिंदे गट)

उदय सिंह राजपूत (कन्नड) : १२४ कोटी (शिवसेना - ठाकरे गट)

किरण लहमाटे (अकोले, नगर) : ११६ कोटी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)

दिलीप वळसे पाटील (आंबेगाव) : ९६ कोटी (राष्ट्रवादी - अजित पवार)

Prashant Bamb, Jayant Patil, Bharat Gogawale, Ajit Pawar
Ahmednagar Politics : ...अखेर नगर जिल्ह्यातील खर्डा ग्रामपंचायतीच्या विभाजनाचा प्रश्न मार्गी; ग्रामसभेत ठराव एकमताने मंजूर

अजित पवार (बारामती) : ७३ कोटी

विनोद निकोले (डहाणू) : ७६ कोटी

अब्दुल सत्तार (सिल्लोड) : ५८ कोटी

महेंद्र दळवी (अलिबाग) : ४५ कोटी

महेंद्र थोरवे (कर्जत) : ४८ कोटी

अदिती तटकरे (श्रीवर्धन) : ४० कोटी

संदीप क्षीरसागर (बीड) : ३५ कोटी

माणिकराव कोकाटे (सिन्नर) : ३३ कोटी

छगन भुजबळ (येवला) : ३१ कोटी

संदीपन भूमरे (पैठण) : २९ कोटी

महेश बाल्डी (उरण) : २८ कोटी

प्रकाश साळुंखे (गेवराई) : १३ कोटी

हसन मुश्रीफ (कागल) : २२ कोटी

धनंजय मुंडे (परळी) : २१ कोटी

संतोष बंगर (कलमनुरी) : १९ कोटी

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com