परमवीर सिंहांच्या अडचणीत वाढ : खंडणीच्या गुन्ह्यात PSI गोपाळे, कोकरे यांना अटक

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे.
Arrest
ArrestSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलिस निरीक्षक आशा कोकरे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील नंदकुमार गोपाळे व आशा कोकरे यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. (PSI Nandkumar Gopale, Asha Kokare arrested for ransom)

श्यामसुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात गोपाळे आणि कोकरे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलिस निरीक्षक आशा कोकरे, पोलिस निरक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Arrest
महादेवराव महाडिकांच्या राजकारणाची सुरुवात झालेल्या संस्थेत गटबाजी : अध्यक्षांचा राजीनामा

श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर श्यामसुंदर अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ठाण्याच्या कोपरी पोलिस ठाण्यात वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Arrest
अजित पवारांनी सोमेश्वर कारखान्याची धुरा सोपवली दोन वर्गमित्रांवर!

यापूर्वी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एसआयटीकडून त्या प्रकरणाचा तपास करण्यात आला होता, त्यानंतर तेच प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आले होते. सीआयडीने तपासाअंती मुंबई पोलिस दलातील अधिकारी नंदकुमार गोपाळे व आशा कोकरे यांना आज अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com