Vijay Wadettiwar : पुणे कार अपघात प्रकरणी वडेट्टीवारांचे पोलिसांवर गंभीर आरोप, तर फडणवीसांनी दिलं 'हे' आश्वासन

Vijay Vadettiwar on Pune Car Accident Case : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपीला पकडल्यानंतर कारवाईला झालेल्या दिरंगाईस पुणे पोलिस आयुक्त जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar On Devendra FadnavisSarkarnama

Mumbai News, 28 June : पुणे कार अपघात प्रकरणात आरोपीला पकडल्यानंतर कारवाईला झालेल्या दिरंगाईस पुणे पोलिस आयुक्त जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. राज्याचं पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु असून याच अधिवेशनात पुणे पोर्शे कार अपघातावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. (Pune car accident case)

पुण्यात, 450 ओपन टेरेस हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलकडून त्या भागातील कोरेगाव, कल्याणनगर भागात 5 लाख रुपयांचा हप्ता वसूल केला जातो. पब नियमांचं उल्लंघन करून अनधिकृत पब सुरु आहेत. 27 पबला कुठलाही परवाना नव्हता. विनापरवाना हे पब चालत असतील तर पोलिस आयुक्त झोपा काढत होते का?" असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

यावर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहितीबाबतचे सत्य समजून त्यावर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिलं. पुणे कार अपघात प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले. या प्रकरणी विधानसभेत लक्षवेधीवर झालेल्या चर्चेत वडेट्टीवार बोलताना म्हणाले, पुण्यात ड्रग्ज माफियांनी थैमान घातले आहे.

Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Eknath Khadse : मनाने भाजपमध्ये असणाऱ्या नाथाभाऊंचा सरकारवर भरोसा नाय का?

शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे त्याच पुण्यात (Pune) बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याना पुण्यात पाठवावे की नाही अशी चिंता पालकांना वाटत आहे.अपघात झालेली कार विना नंबर प्लेट रस्त्यावर कशी धावली, पोलिसांच्या हे का लक्षात आलं नाही? असा सवाल उपस्थित करत धनदांडग्याची कार असल्याने पोलिसांनी सोडली का? असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Video Maharashtra Budget Session 2024 : पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी; अजितदादांचा जनतेला मोठा दिलासा

तर आरोपीला जामीन मिळाला, पोलिस निरीक्षकावर कारवाई केली गेली, यात आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला यामागे राजकीय कारण असून तेही तपासले गेले पाहिजे. दोन निष्पापांचा जीव जातो, विनापरवाना गाडी चालवली जाते, रक्ताचे नमुने बदलण्यापर्यंत हिंमत केली जाते, ससूनमधून ड्रग्ज विकले जाते, या सगळ्याला कुणाचा आशीर्वाद आहे? शिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपीला पकडताना तिथे काही तोडपाणी झालं आहे का? नॉन टीपीची दारू पुण्यात किती विकली जाते याची माहितीही गृहमंत्र्यानी घ्यावी, असं वडेट्टीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com