Punjab Politics : मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढलयं ; एका मंत्र्याचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

Punjab Cabinet : "आप हा कट्टर भ्रष्टाचारी पक्ष आहे,"
Bhagwant Mann , Arvind Kejriwal,
Bhagwant Mann , Arvind Kejriwal, Sarkarnama
Published on
Updated on

Punjab Cabinet: आम आदमी पक्षाचे (AAP) नेते, कॅबिनेटमंत्री फौजा सिंह सरारी यांनी राजीनामा दिल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची अडचण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे,' असे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले आहे. त्यांनी "आप हा कट्टर भ्रष्टाचारी पक्ष आहे," असा आरोप सरारी यांनी केला आहे.(Punjab Politics news update)

फौजा सिंह सरारी यांच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पक्षाने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे समजते. राजीनामा दिल्यानंतर फौजा सिंह सरारी यांनी आम आदमी पक्षावर कडाडून टीका केली आहे.

Bhagwant Mann , Arvind Kejriwal,
Solapur News : फटाका फॅक्टरीच्या आगीचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचा ACB कडून 'स्फोट'

भष्ट्राचाराबाबतची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर फौजा सिंह सरारी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामागे त्यांचे व्यक्तिगत कारण असल्याची चर्चा आहे.

सध्या पंजाब मंत्रिमंडळात १३ कॅबिनेट मंत्री आहे. चार मंत्र्यांच्या जागा रिक्त आहेत. मंत्रीमंडळाच्या विस्ताराबरोबरच असमाधानकारक कामगिरी असलेल्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक मंत्र्यांचे विभाग बदलण्याची शक्यता आहे.शनिवारी पाच वाजता राज्यपाल भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, या कार्यक्रमात नवीन मंत्र्यांचा शपथ विधी होणार असल्याचे समजते.

Bhagwant Mann , Arvind Kejriwal,
Sada Sarvankar News : 'ती' गोळी शिंदे गटातील आमदाराच्या बंदुकीतूनच सुटली..

सध्या पंजाब सरकार शेतकरी आंदोलनं, कायदा सुव्यस्थेच्या घटना, आयएस अधिकारी निलीमा आणि पीसीएस अधिकारी एन. एस. धालीवाल यांच्याविरोधात गुन्हे नोंदवणं या सगळ्या मुद्यांमुळे विरोधकांच्या रोषाचा सामना मुख्यमंत्री करीत आहेत. राज्यातले पीसीएस अधिकारी सामूहिक रजेवर गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com