Rahul Gandhi News : मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादावरून राहुल गांधींचा नेत्यांना कडक इशारा, म्हणाले...

Controversy within the Mumbai Congress : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांना कडक भूमिका घेत कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Maharashtra Congress Politics : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष जरी अव्वल ठरला असला, तरी देखील मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आल्याचे दिसत आहे. तर या अंतर्गत वादावर काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी कडक भूमिका घेतली आहे.

पक्षातील गटबाजी संपवण्याची नेत्यांना राहुल गांधीनी(Rahul Gandhi) ताकीदच दिली आहे. कारण, आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुका पाहता, काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा फटका बसू शकतो.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षात गटबाजी केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा राहुल गांधींनी कडक इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांना कडक भूमिका घेत कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

Rahul Gandhi
Rahul Gandhi in Lok Sabha : है तैयार हम! राहुल गांधींनी लोकसभेतील पहिल्याच भाषणात भरला दम

मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांच्याविरोधात मुंबई काँग्रेसमधील नेत्यांनी दिल्लीत हायकमांडकडे तक्रारी केल्या. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विशेष हे नेते आणि पदाधिकारी यासाठी दिल्लीला प्रत्यक्ष गेले होते. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

Rahul Gandhi
Shadow PM Rahul Gandhi : राहुल गांधींना का म्हटलं जाईल ‘शॅडो PM’? मोदींनी शपथ घेतलेल्या दिवसापासून मिळणार मान...

मुंबई काँग्रेस(Congress) अध्यक्ष पदावरून वर्षा गायकवाड यांना हटवण्यासाठी अनेक नेत्यांनी मागणी केली होती. यासाठी या नेत्यांनी दिल्ली गाठत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, के.सी.वेणुगोपाल आणि राहुल गांधी यांना जाऊन भेटले.

यानंतर मग वर्षा गायकवाड यांच्या समर्थक नेत्यांनीही दिल्लीत जाऊन, वर्षा गायकवाड यांना हटवू नका अशी भूमिका मांडली. यावरून मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने, काँग्रेस श्रेष्ठींनी चांगलीच नाराजी व्यक्त केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com