shambhuraje dasai, ranjitsinh nimbalkar
shambhuraje dasai, ranjitsinh nimbalkarSarkarnama

Shambhuraj Desai On ranjitsinh nimbalkar : राहुल गांधींच्या आषाढी वारीवरुन रणजितसिंह निंबाळकरांना शंभूराज देसाईंचा टोला; म्हणाले, "पांडुरंग बघतोय"

Shambhuraj Desai advice Rahul Gandhi Attend Ashadhi Wari : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यावेळी वारीत पायी सहभागी होणार आहे. राहुल गांधी यांना भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांनी विरोध केला आहे. राहुल गांधी यांच्या सहभागावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.
Published on

Rahul Gandhi at Pandharpur : काँग्रेस नेते राहुल गांधी पंढरपूर वारीत पायी सहभागी होत आहेत. यावरून भाजपने विरोध सुरू केला आहे. मात्र भाजपचा मित्रपक्ष शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाच्या नेत्यांनी स्वागत केले आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी राहुल गांधी पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्यावर भाष्य केले. "राहुल गांधी यांनी वारीत मनोभावे सहभागी व्हावे. वरून पांडुरंग बघतोय", अशी मार्मिक टिप्पणी केली.

भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांनी राहुल गांधी यांनी वारीत पायी सहभागी होण्याला विरोध केला आहे. राहुल गांधी यांनी वारीमध्ये कॅट वॉक करू नये, असे म्हटले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे मतमतांतरे समोर येऊ लागली आहेत. भाजपचे नेते राहुल गांधी यांच्या पायी वारीला विरोध करत असले, तरी भाजपचे मित्रपक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

shambhuraje dasai, ranjitsinh nimbalkar
Rahul Gandhi : राहुल गांधी करणार 'विठ्ठलाचा' जयघोष, 'या' तारखेला होणार वारीत सहभागी

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, "राहुल गांधी यांच्या वारीतील सहभागावर कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्यावे. परंतु मला आठवत नाही, की पूर्वी राहुल गांधी वारीत कधी सहभागी झाले होते म्हणून. यावेळेस ते पहिल्यांदाच येत आहेत. येताय तर त्यांना येऊ द्यावेत. परंतु त्यांनी भक्तीभावे, मनोभावे सहभागी व्हावे. तो पांडुरंग वरून बघतोय". कोण कोणता उद्देश ठेवून येतोय. कोण मनापासून येतोय. यावर अधिक बोलण्यापेक्षा कोणीही यावे आणि पांडुरंगाचरणी लीन व्हावे हे आमच्या महाराष्ट्राची संस्कृती असल्याचेही शंभुराज देसाई यांनी म्हटले.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा यामुळे काँग्रेसला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. आता विधानसभा निवडणुका पुढील तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात होणार आहे. त्याची सत्ताधारी आणि विरोधकांकडून तयारी सुरू आहे. मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्रात लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत.

shambhuraje dasai, ranjitsinh nimbalkar
Rahul Gandhi : राहुल गांधी करणार 'विठ्ठलाचा' जयघोष, 'या' तारखेला होणार वारीत सहभागी

महाराष्ट्रातील शेकडो दिंड्या पांडुरंगाच्या भेटीला निघाल्या आहेत. यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावेळी वारीत पायी सहभागी होणार असल्याची घोषणा केली. यामुळे सत्ताधारी भाजपच्या पोटात गोळा उठला आहे. साताऱ्याचे भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांनी राहुल गांधी यांनी वारीत सहभागी होऊ नये म्हणून विरोध सुरू केला आहे. राहुल गांधी यांना भाजपचा हा विरोध राजकीय हेतूतून होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com