rahul gandhi in ashadhi wari
rahul gandhi in ashadhi warisarkarnama

Rahul Gandhi : राहुल गांधी करणार 'विठ्ठलाचा' जयघोष, 'या' तारखेला होणार वारीत सहभागी

Rahul Gandhi Attend Ashadhi Wari : वारीत सहभागी होऊन राहुल गांधी वारकऱ्यांसोबत चालणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या आमदारानं दिली आहे.
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी राहुल गांधी यांना आषाढी वारीचं महत्त्व सांगितलं. त्यासह वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. यानंतर मोठी माहिती समोर आली आहे.

राहुल गांधी ( Rahul Gandhi ) वारीत सहभागी होऊन संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेणार आहेत. त्यासह ते वारकऱ्यांसोबत पायी चालणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी दिली आहे. त्यामुळे वारीत सहभागी होऊन राहुल गांधी 'विठ्ठलाचा' जयघोष करणार आहेत.

आमदार संजय जगताप ( Sanjay Jagtap ) म्हणाले, "राहुल गांधी 14 जुलैला वारीत सहभागी होणार आहेत. ते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेणार आहेत. सर्वसामान्य वारकऱ्यांप्रमाणे राहुल गांधी पायी वारीत चालतील."

rahul gandhi in ashadhi wari
Prithviraj Chavan : माझी लाडकी बहीण योजनेवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला झोडपले; नेमके काय म्हणाले?

राहुल गांधी यांना वारीत सहभागी होऊ न देण्याची भूमिका शिवसेनेनं ( शिंदे गट ) घेतली आहे. यावरही संजय जगतापांनी भाष्य केलं आहे. "वारीच्या सोहळ्यात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवावे. तुम्हाला सहभागी व्हायचं तर सहभागी व्हा. तसेच, वारीच्या सोहळ्यात असलेल्या त्रुटी दूर करा," असा सल्ला संजय जगताप यांनी शिवसेनेला दिला आहे.

दरम्यान, मंगळवारी राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार, माढ्याचे खासदार धैर्यशील पाटील, भिवंडीचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार संजय दिना पाटील यांनी राहुल गांधी यांची वारीत सहभागी होण्यासाठी भेट घेतली होती.

rahul gandhi in ashadhi wari
Rahul Gandhi Letter to PM Modi : लोकसभेतील प्रचंड गदारोळानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाले...

या भेटीनंतर धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, "शरद पवार यांच्या नेतृत्वात आम्ही राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांना पंढरपूरच्या वारीचं निमंत्रण दिलं. त्याशिवाय शरद पवार यांनी राहुल गांधी यांना वारीचं महत्त्वही सांगितलं आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com