Saamana Editorial News : राहुल गांधींचे पुरावे मान्य नसतील तर भाजपने पुरावे द्यावेत; 'सामना'तून मोदी सरकारवर टीकास्त्र!

Uddhav Thackeray On Modi Sarkar : "राहुल गांधींचे हे साहस एखाद्या वीर जवानाप्रमाणे आहेत, देशभक्तीचा मक्ता भाजपनेच घेतलेला नाही!"
Saamana Editorial
Saamana EditorialSarkarnama

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून सामनातून भाजपवर निशाणा साधला जात आहे. सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लडाख दौऱ्यावर आहेत. त्याचाच धागा धरत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर (BJP) टीकेचे बॅन सोडण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

चीनच्या घुसखोरीच्या बाबतीत राहुल गांधी यांनी दिलेले पुरावे जर भाजपला मान्य नसतील तर त्यांनी पुरावे मांडावेत. भाजपने सत्य काय ते देशासमोर आणावे, अशा शब्दांत सामनातून भाजपला फटकारले आहे. त्यासोबतच पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. (Saamana Editorial News)

Saamana Editorial
Narendra Modi News : 'गद्दारांना सोबत घेऊन मोदी सरकारने महाराष्ट्राची लूट चालवली' ; माजी मुख्यमंत्र्यांचा घणाघात !

सामनाचा अग्रलेखात म्हटले आहे की, 'चीनचे लष्करी सामर्थ्य हिंदुस्थानच्या तुलनेत प्रचंड आहे. पंतप्रधान मोदी यांनी चिनी राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादेत आणून कितीही ‘झोके’ दिले तरी ‘भाई-भाई’ किंवा ‘मैत्री’ अशा भाकड कथांवर चीन विश्वास ठेवत नाही . चीनने लडाखमध्ये घुसखोरी केलीच आहे व अनेकदा चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश दाखवून आपल्याला डिवचले जाते. मोदींसारखा 'सुपरमॅन' पंतप्रधान आपल्याला लाभला असताना चीनने हिंदुस्थानच्या बाबतीत अशी वाकडी पावले टाकावीत, हे मोदी भक्तांना मान्य होणार नाही . लडाखच्या भूमीवर राहुल गांधी आहेत. त्यांनी चिनी घुसखोरीचे सत्य मांडले. भाजपला ते मान्य नसेल तर नेमके सत्य काय ते त्यांनी पुराव्यासह मांडावे.'

Saamana Editorial
Eknath Shinde On Onion Issue: केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; मुख्यमंत्री शिंदेंनी मानले मोदी, शाहांचे आभार

'गेल्या काही दिवसापासून राहुल गांधी सध्या लेह आणि लडाखच्या दौऱ्यावर आहेत व तेथील जनतेने राहुल गांधी यांच्या दौऱ्यास उदंड प्रतिसाद दिला आहे. लडाखच्या सीमेवरून चीन सतत धडका मारीत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी करून जमीन बळकावली आहे. अनेक ठिकाणी चिनी व हिंदुस्थानी सैनिकांत संघर्ष झाला, पण पंतप्रधान मोदी हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत. लडाखची इंचभरही जमीन गमावलेली नाही, असा दावा पंतप्रधान मोदी करतात, पण मोदी सपशेल खोटे बोलत आहेत व चीनने आपल्या भूभागावर अतिक्रमण केले असल्याचे सत्य राहुल गांधी यांनी मांडले आहे.'

चीनने हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी केलीच आहे. गायरान जमिनी चीनने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे इंचभरही जमीन गमावली नाही हा पंतप्रधान मोदींचा दावा खोटा असल्याचे राहुल गांधी यांनी लडाखच्या भूमीवरून स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत सत्य मांडल्याने भारतीय जनता पक्षाने टीका सुरू केली व पुन्हा एकदा मोदी भक्त भूतकाळातले खड्डे नव्याने उकरू लागले. भाजपच्या मते राहुल गांधी हे देशाचा अपमान करीत आहेत.

Saamana Editorial
Satara NCP News : मित्र पक्षांनी शरद पवारांबाबत जपून वक्तव्ये करावीत : शशिकांत शिंदेंचा राऊतांना इशारा

चीनने घुसखोरी केली काय? असा प्रश्न विचारल्याने देशाचा कोणता व कसा अपमान झाला? हे भाजप प्रवक्त्यांना सांगता येईल काय? राहुल गांधी स्वतः मोटरसायकल चालवीत लेहवरून लडाखला गेले. हा रस्ता दुर्गम व धोक्याचा आहे. राहुल गांधींचे हे साहस एखाद्या वीर जवानाप्रमाणे आहे. तेथून ते पेन्गाँगला पोहोचले व नुबरा, कारगील येथेही गेले. हे सर्व करण्यामागे राहुल गांधी यांची देशभक्ती आहे. देशभक्तीचा मक्ता भाजपनेच घेतलेला नाही, अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com